अंडरवर्ल्ड डॉनला जबरदस्त दणका : दाऊद इब्राहिमची खेड, लोटेतील जमीन 1.38 लाखापासून विक्रीस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

दाऊदच्या  रत्नागिरी जिल्ह्यातील  मुंबके गावात ६ मालमत्ता आहेत. 

 रत्नागिरी : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६ मालमत्तेचा लिलाव होणार आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी त्याच्या एकूण ७ मालमत्तेचा लिलाव होत असून यातील ६ मालमत्ता या रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबके गावात आहेत. 

 डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर मोदी सरकार कडक कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात दाऊदच्या संपत्तीचा सर्वात मोठा लिलाव नोव्हेंबरमध्ये होणार आहे. हा लिलाव स्मगलर्स अॅंण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत होईल. यानुसार 10 नोव्हेंबर रोजी दाऊदच्या 7 संपतीचा लिलाव करण्यात येईल. कोरोनामुळे हा लिलाव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.सार्वजनिक लिलावाच्या माध्यमातून संपत्तीची विक्री होईल.

असा होणार लिलाव

18 गुंठे जमीन – राखीव किंमत 1.38 लाख

20 गुंठे जमीन – राखीव किंमत 1.52 लाख

24.90 गुंठे जमीन – राखीव किंमत 1.89लाख

27 गुंठे जमीन – राखीव किंमत2.5लाख

29.30 गुंठे जमीन – राखीव किंमत 2.23 लाख

घर क्रमांक 172आणि 27गुंठे जमीन – राखीव किंमत 5.35लाख

याशिवाय लोटे गावात 30 गुंठे जमीन आहे.  ज्याची राखीव किंमत 61.48 लाख ठेवण्यात आली आहे.

यापूर्वी 2018 मध्ये दाऊद इब्राहिमची मुंबईस्थित संपत्तीचा 3.51 कोटींमध्ये लिलाव झाला होता. या लिलावात खूप जणं सहभागी झाले होते. सर्वात जास्त बोली सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीएटी) ने लावली आणि दाऊदच्या संपत्तीचे मालक झाले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dawood Ibrahim Khed Lote land sold for Rs 1.38 lakh