"तो' मृतदेह अखेर काढला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सावंतवाडी - नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज आत्मक्‍लेशाचे हत्यार उपसत आंदोलन सुरू केल्यानंतर अवघ्या तासात यंत्रणा हलली. तो मृतदेह प्रशासनाने बाहेर काढून अधिकृत स्मशानभूमीत दफन केला. यामुुळे अखेर गेले काही दिवस सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. 

श्रमविहार कॉलनीत दफन केलेला तो मृतदेह काढून सालईवाडा येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला. यासाठी ख्रिश्‍चन धर्मप्रांताचे महाधर्मगुरू ऑल्वीन बरेटो यांनी लेखी पत्र दिल्यानंतर ही प्रक्रिया झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी दिली. 

सावंतवाडी - नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज आत्मक्‍लेशाचे हत्यार उपसत आंदोलन सुरू केल्यानंतर अवघ्या तासात यंत्रणा हलली. तो मृतदेह प्रशासनाने बाहेर काढून अधिकृत स्मशानभूमीत दफन केला. यामुुळे अखेर गेले काही दिवस सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. 

श्रमविहार कॉलनीत दफन केलेला तो मृतदेह काढून सालईवाडा येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला. यासाठी ख्रिश्‍चन धर्मप्रांताचे महाधर्मगुरू ऑल्वीन बरेटो यांनी लेखी पत्र दिल्यानंतर ही प्रक्रिया झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी दिली. 

शहरातील श्रमविहार कॉलनीतील भरवस्तीत दफन करण्यात आलेल्या मृतदेहामुळे गेले काही दिवस शांतता आणि सलोखा बिघडण्यास सुरवात झाली होती. भरवस्तीत दफन करण्यात आलेला तो मृतदेह ख्रिश्‍चनधर्मीयांच्या अधिकृत दफनभूमीत दफन करा, अशी रहिवाशांची मागणी होती. त्या मागणीवर तोडगा काढण्यात पालकमंत्री अपयशी ठरले होते. दोन्ही गटांची वेगवेगळी बैठक घेऊन एकतर्फी निर्णय जाहीर केल्याचा आरोप खुद्द त्यांच्याच पक्षाचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी केला. त्यांच्या या भूमिकेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला. 

आज सकाळी श्री. साळगावकर यांनी ठरल्यानुसार बापूसाहेब पुतळ्याजवळ आपले आत्मक्‍लेश आंदोलन सुरू केले. त्यांनी या आंदोलनात आपण एकटेच सहभागी होणार असल्याचे जाहीर केले; मात्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरवात केली. 

दरम्यान, साळगावकर आंदोलनात बसल्याचे कळताच यंत्रणेची धावाधाव उडाली. काही वेळातच मृतदेह दफन करण्यात आलेल्या जागेत पोलिस, तहसीलदार, महसूलचे अधिकारी सर्व साहित्यासह दाखल झाले. त्यांनी मृतदेह काढण्यास सुरवात केली. याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. अडीच तासाच्या प्रयत्नानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, प्रभारी तहसीलदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून सालईवाडा येथील दुसऱ्या दफनभूमीत दफन करण्यात आला. 

पालिका अधिकारी आसावरी केळबाईकर, दीपक म्हापसेकर यांच्यासह चतुर्थ कर्मचारी मोहन कांबळी, विठ्ठल मालंडकर, निवेद कांबळी, जयवंत जाधव, दाजीबा कांबळी, सूर्यकांत कदम, शंकर आसोलकर, नागेश कोचरेकर, धोडींबा बरागडे आणि भागू पाटील आदी पालिका कर्मचाऱ्यांनी काम पूर्ण केले. 

मृतदेह काढल्यानंतरसुद्धा श्री. साळगावकर यांनी आपले आत्मक्‍लेश आंदोलन तसेच सुरू ठेवले. उशिरापर्यंत आंदोलनस्थळी अनेक नागरिकांनी भेटी दिल्या. यात अफरोझ राजगुरू, सचिन इंगळे, अन्नपूर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, प्रशांत कवठणकर, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, भगवान रेडकर, प्रकाश पेडणेकर, गजानन सावंत, प्रसाद पावसकर, महेश सुकी, शुभांगी सुकी, किर्ती बोंद्रे, मनोज नाईक, पराग मडकईकर, शब्बीर मणियार, अमेय मोघे, प्रशांत कोठावळे, बाळ बोर्डेकर, मनोज नार्वेकर, अमित परब, विष्णू केदार, मंगेश तळवणेकर, संदीप टोपले, शिवप्रसाद कोळंबेकर, नागेश नेवगी, प्रवीण केसरकर, कल्पना सगम, परिणिता वर्तक, बंड्या कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

धर्मगुरूंनी घेतले एक पाऊल मागे 
त्या ठिकाणी पुरलेल्या मृतदेहामुळे शांतता आणि सलोखा बिघडत असेल तर तो मृतदेह प्रशासनाने काढून अन्य ठिकाणी दफन करावा, त्याबाबत आमची हरकत राहणार नाही, असे लेखी पत्र खुद्द खिश्‍चन धर्मगुरूंकडून दिल्यानंतर ही कारवाई करणे शक्‍य झाले, असे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी सांगितले. 

* नगराध्यक्षाच्या आंदोलनाला सर्वधर्मीयांचा पाठिंबा 
* सुमारे दीड हजार नागरिकांनी लावली आंदोलनस्थळी हजेरी 
* स्वराज्य संघटना व साळगावकरांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी 
* केसरकर यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी गेलेल्या स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आणि पोलिसात वादावादी 
* आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट 

Web Title: Dead bodies were finally removed