नदीपात्रात मृत माकड सापडल्याने खळबळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

वैभववाडी - कुसूर मधलीवाडी येथील नदीपात्रात मृत माकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, सभापती आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. माकडाचे शवविच्छेदन करून व्हिसेरा तपासणीकरिता पुण्याला पाठवला आहे. 

दोडामार्ग आणि बांदा परिसरांत सध्या माकडतापाची प्रचंड भीती आहे. परिसरात माकडतापाचे काही रुग्ण सापडले आहेत. आज तालुक्‍यातील कुसूर मधलीवाडी येथील नदीपात्रात मृत माकड आढळले. याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. ही माहिती गावात समजाताच एकच खळबळ उडाली. माकडाचा मृत्यू कशाने झाला याचीच चर्चा गावात सुरू होती. 

सभापती लक्ष्मण रावराणे, सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भरसट, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. कांबळे, आरोग्य विस्तार अधिकारी आर. डी. जोशी हे कुसूरमध्ये दाखल झाले. माकडाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. मृत माकडाचा व्हिसेरा पुणे येथील लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. माकडाच्या मृत्यूचे कारण लॅबच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, ज्या ठिकाणी मृत माकड आढळले त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मृत माकडाची वन विभागाने विल्हेवाट लावली. या घटनेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मधलीवाडी परिसरात सर्वेक्षण करण्यात आले; मात्र कुणामध्येही सर्दी, तापाची लक्षणे आढळलेली नाहीत. संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी सी. वाय. महानूर यांनी स्थानिक आरोग्य सेवकांना दिल्या आहेत. 

नागरिक हैराण... 
दोडामार्ग, बांदा हा परिसर सध्या माकडतापाने हैराण आहे. या तापाची भीती लोकांमध्ये आहे. ज्या भागात हा ताप आहे त्या भागात मृत माकडे आढळून आली होती. तशाच पद्धतीने मृत माकड कुसूर मधलीवाडी नदीपात्रात सापडल्यामुळे येथील लोकांनीसुद्धा थेट मृत माकडाचा संदर्भ त्या घटनेशी लावण्यास सुरवात केली आहे. 

Web Title: Dead monkey found in river