सोलगावमध्ये आढळला मृत बिबट्या...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

 सोलगाव देसाईवाडी (ता. राजापूर) येथे आज सकाळी मृत बिबटया आढळुन आला आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण असून स्पष्ट झालेले नाही.

रत्नागिरी - सोलगाव देसाईवाडी (ता. राजापूर) येथे आज सकाळी मृत बिबटया आढळुन आला आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण असून स्पष्ट झालेले नाही. वन विभाग पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने त्याची तपासणी करीत आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूमुळे संचारबंदी लागू आहे. घरातून बाहेर पडायला परवानगी नाही. अशातच गुरुवारी राजापुरातील सोलगाव देसाईवाडी येथे मृत बिबट्या आढळून आला आहे. एका झुडपाजवळ तो मृत्यू असल्याचे आढळला. ग्रामस्थांनी याची कल्पना वन विभागाला दिली. त्यानंतर पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सुरू आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead panther found in Solgaon rajapur