सावित्री नदीच्या पाण्यात बुडून आदिवासी दांपत्याचा मृत्यु

सुनील पाटक
बुधवार, 11 एप्रिल 2018

महाड- सावित्री नदीच्या पाण्यात बुडून माणगाव तालुक्यातील पोणसे आदिवासी वाडीतील दांपत्याचा मृत्यु झाला. दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडले.

सुंदरा लल्ला माळी (वय 40) व लल्ला गणपत माळी (वय 42) असे या मृत दांपत्याचे नावे आहे. महाड जवळील शिरगाव येथील एका विटभट्टीवर पोणसे आदिवासी वाडीत हे दांपत्य कामाला होते. 9 एप्रिलला सायंकाळी सुंदरा आपले काम आटोपल्यावर सावित्री नदीत आंघोळीला गेली असता नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा मृ्त्यु झाला. पत्निला वाचविण्यासाठी लल्ला यांनीही पाण्यात उडी टाकली परंतु, हे दोघेही पाण्यात बुडाले. 

10 एप्रिल रोजी दुपारी सुंदरा हिचा म़ृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला. त्यानंतर 11 एप्रिल रोजी लल्ला यांचा म़ृतदेह पाण्यात सापडला. या दांपत्याचा मुलगा भरत याने पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली.

Web Title: Death of adivasi couple, drowning in savitri river water