भीषण अपघातात माजी सैनिकाचा जागीच मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

सावंतवाडी-आंबोली मार्गावर धवडकी येथे मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कलंबिस्त मळा येथील माजी सैनिकाचा मृत्यू झाला. अमोल नारायण माणगावकर (वय 55) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला

सावंतवाडी - सावंतवाडी-आंबोली मार्गावर धवडकी येथे मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कलंबिस्त मळा येथील माजी सैनिकाचा मृत्यू झाला. अमोल नारायण माणगावकर (वय 55) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.

हे पण वाचा - चक्क...स्मशानातून वाळू चोरीचा प्रताप

माणगावकर हे सैन्यातून नाईक या पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर ते गोवा पणजी येथे इंडियन ऑइल या कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. आज दुपारी ते गोवा येथे कामाला जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. माडखोल धवडकी येथील रुना हॉटेल समोर सावंतवाडीच्या दिशेने येणारी मोटार विरुद्ध दिशेने जाऊन माणगावकर यांच्या दुचाकीला धडक बसली. यात माणगावकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. मात्र माणगावकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

हे पण वाचा - हुल्लडबाजी बेततेय जीवावर; कंदलगाव तलावात आठवड्यात दुसरा बळी 

अपघाताची माहिती समजतात सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. माणगावकर यांच्या मृत्यूची वार्ता समजतात अनेकांनी धाव घेत मोठी गर्दी केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of a former soldier in accident at sawantwadi