बिबट्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

गुहागर - रानवीमध्ये मृत्युमुखी पडलेला बिबट्या भक्ष्याअभावी भुकेने मृत झाली की इतर कोणत्या कारणाने याची निश्‍चिती करण्याला कोकणात मर्यादा आहेत. सकृतदर्शनी तो भुकेने गेला असा निष्कर्ष काढण्यात आला. त्याला अनेक कारणांमुळे भक्ष्य मिळाले नाही, असा अंदाज करण्यात येत आहे. त्यातच येथे उपचारावर मर्यादा पडतात.

बिबट्याचा वावर साधारणपणे लोकवस्ती आणि जंगल यांच्या सीमारेषेवर असतो. जंगलात खाद्य मिळाले नाही, तर बिबट्या लोकवस्तीत घुसून कुत्रा, मांजर, गुरे अपवादात्मक परिस्थितीत माणसांवर हल्ला करतात. रानवीत बारगोडे यांच्या घराजवळील खोपटीमध्ये आलेला बिबट्या भुकेला होता. वस्तीत भक्ष्यासाठी आला. मुसळधार पाऊसात मोकाट गुरे, भटकी आडोशाला जातात. कोकणातील जंगलातून ससे पावसात बाहेर पडत नाहीत. रानवीच्या माळावर मोर आहेत. तेथे बिबट्याही दिसला होता. सध्या मात्र या माळावर मोर दिसत नाहीत. लोकवस्तीजवळ हिरवा चारा झाल्याने गुरे आसपासच चरतात. त्यामुळे त्याला भक्ष्य मिळाले नाही. 

रानवीत बिबट्या अर्धमेल्या स्थितीत होता, तेव्हा तातडीने उपचार मिळाले असते तर वाचला असता. आवश्‍यक साधने आणि पशुवैद्यकीय अधिकारी असते तर उपचारही झाले असते. याबाबत बोलताना पशुवैद्यकीय अधिकारी संतोष निमुणकर म्हणाले की, अशा चर्चा निरर्थक असतात.  दोन दिवस उपाशी असणाऱ्या बिबट्याला सलाईनमधून औषधे दिली असती तर त्याचे शरीर थंड पडले असते. अशावेळी बिबट्याला नेमके काय झाले आहे याची चिकित्सा होणे आवश्‍यक असते. तशा सोयीच आपल्याकडील पशुवैद्यक दवाखान्यात उपलब्ध नाहीत. वन्यप्राणी जखमी झाला, तर प्राथमिक उपचारानंतर त्याला सोडून देतो. वन्यप्राण्यांवर उपचार करणारे रुग्णालय केवळ मुंबईत आहे. वन विभागाचे कर्मचारी आणि आम्ही उपलब्ध साहित्य आणि औषधातून उपचार करण्याचा प्रयत्न करतो, याला मर्यादा आहेत.

Web Title: death of leopards in ranvi