लाटांच्या तडाख्याने बल्यावावरून समुद्रात फेकला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू

लाटांच्या तडाख्याने बल्यावावरून समुद्रात फेकला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू

मालवण - सोसाट्याच्या वाऱ्यात उसळलेल्या लाटांच्या तडाख्यात बल्यावावरून समुद्रात फेकला गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह तळाशील किनारी आढळून आला आहे.  कल्पेश नंदकुमार कुमठेकर (२७, रा. खासकीलवाडा,  सावंतवाडी सध्या रा. देवबाग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळला. मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात तो विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. पोलिसात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.  

देवबाग येथे आजोबांकडे वास्तव्यास असलेल्या कल्पेश याने सर्जेकोट येथून एक बल्याव भाडेकराराने घेतले. मुकेश कांदळगावकर (३५), शेखर कांदळगावकर (४३) यांना घेऊन तो काल सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान सर्जेकोट येथील समुद्रातून नस्ताच्या बाजूने देवबाग येथे जात होते. यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसळलेल्या लाटांच्या तडाख्यात बल्याव सापडले. यात लाटेच्या माऱ्यात बल्यावावरील कल्पेश हा समुद्रात फेकला गेला.

समुद्र खवळलेला असल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या अन्य दोघांनी कसाबसा बल्यावासह किनारा गाठला. या घटनेची माहिती त्यांनी देवबाग येथील नातेवाईकांना दिली. त्यानुसार मनोज खोबरेकर, बाबली चोपडेकर, चंद्रशेखर कुमठेकर, शंकर कुमठेकर, मनोज चोपडेकर, अजय केळुसकर, अण्णा राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने कल्पेशचा समुद्रात शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र काळोखात त्याचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे रात्री उशिरा शोधमोहीम थांबविण्यात आली. 

आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान महेश कोचरेकर यांना तळाशील येथील समुद्रकिनारी कल्पेशचा मृतदेह दिसून आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या मागे आई, पत्नी, मुलगा, भाऊ, काका, काकी, आजोबा असा परिवार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com