एस.टी बस अपघातातील तीन वर्षाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू

अमित गवळे 
बुधवार, 11 जुलै 2018

पाली : पेण खेमवाडी एस.टी बसला मंगळवारी (ता.10) वरवणे गावाजवळ अपघात झाला होता. या अपघातात 36 प्रवाशी जखमी झाले. या अपघातात सुधागड तालुक्यातील महागाव-कवेळे ठाकूरवाडी येथिल मोहिनी नामदेव वाघ (वय 3) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या चिमुरडीच्या मृत्यूमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

पाली : पेण खेमवाडी एस.टी बसला मंगळवारी (ता.10) वरवणे गावाजवळ अपघात झाला होता. या अपघातात 36 प्रवाशी जखमी झाले. या अपघातात सुधागड तालुक्यातील महागाव-कवेळे ठाकूरवाडी येथिल मोहिनी नामदेव वाघ (वय 3) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या चिमुरडीच्या मृत्यूमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातातील एम.जी.एम हॉस्पीटल पनवेल, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग तसेच ग्रामीण रुग्णालय पेण येथे उपचार सुरु आहेत. मोहिनीवर एम.जी.एम. हॉस्पीटल पनवेल येथे उपचार सुरु होते. मोहिनी वाघ या चिमुरडीची आई मनिषा व वडील नामदेव वाघ हे देखील या बस अपघातात जखमी झाले आहेत. मोहिनीच्या अपघाती निधनाने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच मोहीणी हिचा मृतदेह एम.जी.एम रुग्नालयातून शवविच्छेदनास पनवेल महानगरपालिके जवळील शवविच्छेदन केंद्रात आणले असता डॉक्टर वेळेवर उपलब्द न झाल्याने मृत मोहीनी च्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला.

अपघातग्रस्तांना एम.जी.एम रुग्नालयात महागाव ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर भालचंद्र पार्टे, महागाव उपसरपंच वैभव पवार, वरवणे सरपंच महादू मानकर, उपसरपंच अंकुश कडू, वरवणे माजी सरपंच योगेश तोंडीलकर आदिंसह ग्रामस्तांनी मदत केली. 

एस.टी बस .अपघातात मयत झालेल्या मोहिनी वाघ हिच्या कुटुंबियांना अंत्ययात्रेसाठी प्राथमिक स्वरुपात दहा हजार रुपयाची तत्काळ मदत दिली जाणार आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची पुतर्ता झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नियमानुसार किमान पाच ते दहा लाखाची मदत दिली जाईल. तसेच रुग्णालयात उपचार घेणार्‍या जखमींना एक हजार रुपयाची प्राथमिक मदत दिली जाणार असून कागदपत्रांची पुर्तता झाल्यावर पुढील मदत दिली जाईल.

एम.बी. जुनेदी, आगार व्यवस्थापक, पेण

एस.टी बसचे वाढते अपघात चिंताजनक असून एका वाहनचालकाच्या बेदारकारपणामुळे अनेक प्रवाशांचा जिव धोक्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अपघातातील मृत व गंभीर जखमींना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी.

भास्कर पार्टे, सरपंच महागाव ग्रामपंचायत

Web Title: Death of a three-year-old chimney doctor in the ST bus accident