उपसभापती गुजर यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी नाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

दाभोळ - दापोलीचे आमदार संजय कदम व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर यांचे आदेश धुडकावत उपसभापती राजेश गुजर यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पत्रकारांना बसण्यास मज्जाव केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली असून अवघ्या महिन्याभरातच पदाधिकारी नेत्यांचे आदेश धुडकावून लागल्याने आगामी काळात हे पदाधिकारी काय लोकसेवा करणार, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी दापोलीतील पत्रकारांशी संपर्क साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकारांचा नेहमीच सन्मान केला आहे. पत्रकारांबरोबर आमचे मैत्रीचे संबंध आजपर्यंत राहिले असून, आगामी काळातही ते तसेच कायम राहतील, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर ज्यावेळी निकाल घोषित झाले व राष्ट्रवादीची सत्ता पंचायत समितीवर आली त्यावेळी राष्ट्रवादीचे आ. संजय कदम व तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर यांनीच पत्रकारांना यापुढे मासिक बैठकांना बसू दिले जाईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे आमच्या नेत्यांनी आश्‍वासन पाळले व पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली होती. मात्र पदाधिकाऱ्यांनी मनमानीपणा केला असून आमदार कदम हेच याप्रकरणात लक्ष घालतील, असे सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात काही पंचायत समिती सदस्यांजवळ संपर्क साधला असता पत्रकारांना मासिक बैठकीत बसू देण्यास आमची कोणाचीच हरकत नव्हती. मात्र उपसभापती राजेश गुजर यांनी कोणाच्या सांगण्यावरून असा निर्णय घेतला हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले व या निर्णयापासून आपण दूर असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: The decision angered the Nationalist Deputy gujar