देशातील पहिली बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी वेंगुर्लेत - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

वेंगुर्ले - देशातील पहिली बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी लवकरच वेंगुर्ले बंदर जेटी येथे दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने बंदरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. बंदर जेटी परिसराचे सुशोभीकरणही केले जाणार असून त्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

येथील पालिकेच्यावतीने कॅम्प मैदानावर आयोजित महिला राष्ट्रीय ड्रॉप व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी येथे दौऱ्यावर आलेल्या श्री. केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""तिलारी योजनेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तिलारीचे पाणी वेंगुर्ले शहरासह तालुक्‍याला पुरविण्यात येणार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत शहराला पाणीपुरवठा सुरू होईल. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज शहरातील सेंट लुक्‍स हॉस्पिटल येथे उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागणारी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहराच्या प्रवेशद्वारांवर कायमस्वरूपी कमानी उभारण्यासाठी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केलेल्या मागणीनुसार 36 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. मांडवी खाडीत ब्रेक वॉटर वॉलचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठीचे आपले प्रयत्न सुरू आहेत.''

याप्रसंगी सभापती सुनील मोरजकर, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, माजी उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, नगरसेवक संदेश निकम, शिवसेना शहरप्रमुख विवेक आरोलकर आदी उपस्थित होते.

Web Title: Deepak Kesarkar comment