महिला सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्गला 25 कोटी - दीपक केसरकर

महिला सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्गला 25 कोटी - दीपक केसरकर

सावंतवाडी - महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा; परंतु या खात्याचा मंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत असल्याचे महाराष्ट्र राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. 

पाडलोस - भाकरवाडी - रोणापाल रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, ""शेळीपालन, गाय-म्हैस दुध व्यवसाय, काथ्या व्यवसायासाठी शंभर टक्के अनुदान देणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घ्या. शेतकरी सुखी व्हायला पाहिजे. नारळाच्या बागांमध्ये कशाप्रकारे उत्पन्न घ्यायचे. तुमच्या प्रेमापोटीच महाराष्ट्राची जबाबदारी पेलत आहे. गावामध्ये समृद्धी आली पाहिजे, लोकांजवळ पैसे आले पाहिजे. तुम्हाला जो व्यवसाय करायचा असेल त्याला सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार. पर्यटकांना घरात आणावयाचे असल्यास 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. बांदा येथे भव्य प्रवेशद्वार बांधणार आहे. रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितलेल्या सर्व रस्त्यांसाठी निधी दिला जाईल. राजकारण फक्त निवडणुकीपुरतेच ठेवून नंतर पुन्हा एकत्र येणे महत्वाचे आहे. 

...तर मंत्रीपदाचे सार्थक होईल 
ज्याठिकाणी शांतता असते तेथे समृद्धी येते आणि जेथे समृद्धी येते तेथे लक्ष्मी येते. ज्या दिवशी ही समृद्धी तुमच्या घरामध्ये येईल त्यावेळी तुम्ही मला आमदार केल्याचे अन्‌ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री केल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले असे मला वाटेल, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com