चांदा ते बांदामुळे कृषीक्षेत्राला बळकटी - दीपक केसरकर 

चांदा ते बांदामुळे कृषीक्षेत्राला बळकटी - दीपक केसरकर 

सिंधुदुर्गनगरी - चांदा ते बांदा, फळझाड लागवड या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासास चालना मिळत आहे. यासाठीच कृषि यांत्रिकीकरण, पशुसंवर्धनाच्या कुक्कुट पालन, शेळी-मेंढी पालन, नौका यांत्रिकीकरण, केज फिशिंग आदी योजनांचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. येथील पोलिस परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहणाच्या समारंभावेळी ते बोलत होते. 

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हाअधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, अप्पर पोलिस अधिक्षक निमित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, आमदार वैभव नाईक, अतुल काळसेकर उपस्थित होते. 

श्री. केसरकर म्हणाले, लोकशाही सदृढ करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेविषयी सतत शिक्षणाद्वारे जागरुकता आवश्‍यक आहे. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून, विविध प्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. शासनाने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये चांदा ते बांदा सारख्या अभिनव व महत्वकांक्षी योजनेचाही समावेश आहे. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, फळबाग लागवड या सारख्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा.'' 

ध्वजारोहणानंतर, पोलिसत उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, उत्कृष्ट खेळाडू पोलिस कॉन्टेबल राहूल काळे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉन बॉस्को हायस्कूलच्या स्काऊटच्या विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तर डॉन बॉस्को हायस्कूलच्या गाईडनीही सुवर्ण व रौप्य पदक पटकावल्याबद्दल त्यांचाही सन्मान झाला. त्यानंतर पोलिस निरीक्षक कविता फडतरे यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस प्लाटून एक, दोन, व तीन, तसेच होमगार्ड पुरुष व महिला पथक, आंबोली सैनिक स्कूलचे पथक व स्काऊड व गाईड पथक, जिल्हा पोलिस बॅंड पथक, श्वान पथक, वज्र, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक यांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. 

त्यानंतर जिल्हा श्वान पथकाने प्रात्यक्षिक सादर केली. डॉन बॉस्को हायस्कूलच्या ढोल ताशा पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा व त्यांचे चरित्र यावर अधारित कार्यक्रम सादर केला. समाजकार्य महाविद्यालय कुडाळ यांनी जागो ग्राहक जागो हे पथनाट्य सादर केले. तर कार्यक्रमाचा समारोप बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर संगीतमय कार्यक्रमाने झाला. 

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी उपस्थित होते. जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपस्थित होते.

जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.डी. जगमलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा न्यायाधिश वर्ग एक न्यायाधिश पी. आर. कदम, मुख्य न्यायाधिश व्ही.ए.पत्रावळे, जिल्हा न्याय व विधी प्राधिकरणचे सचिव ए.आर. उबाळे, जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रबंधक जे.जे.खान, न्यायालयीन व्यवस्थापक, सिंधुदुर्ग प्र.प. माळकर, ज्येष्ठ वकील व्ही.आर. पांगम यांच्यासह जिल्हा सत्र न्यायालयाचे कर्मचारी व वकील वर्ग उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com