राणेंच्या सेनाप्रवेशाबाबत केसरकरांचे कानावर हात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

सावंतवाडी - ""कॉंग्रेस नेते नारायण राणे शिवसेनेत येताहेत की नाही, हे मला माहीत नाही. अशा प्रकारचे मोठे निर्णय पक्षप्रमुख घेतात. त्यामुळे आपण याबाबत काहीही बोलणार नाही,'' असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले. 

राणे कॉंग्रेसमधून स्वगृही येत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. त्याला राज्यभर तोंड फुटले आहे. राणे यांनी याचा इन्कार केला असला, तरी याबाबत त्यांचे राजकीय स्पर्धक व शिवसेनेचे नेते केसरकर यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, त्यांनी अशा पद्धतीने आपली भूमिका व्यक्त केली. 

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी आपणच सुचविलेल्या कामांसाठी केसरकर यांनी निधी आणला, अशी टीका केली होती, या टीकेला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ""राणे आता मंत्रिपदावर नाहीत. त्यांना आता सत्तेतून दूर झाल्यापासून तब्बल दोन ते अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे आपणच सुचविलेली कामे अर्थसंकल्पात घेण्यात आली, अशी राणे यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. केवळ टीकेचा भाग सोडला तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आहे. समाजातील तसेच तळागाळातील लोकांचा विकास डोळ्यांसमोर ठेवून हे सर्व कार्य केले आहे. रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी आणला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे बजेटची रक्कम एकशे साठ कोटीपर्यत नेली आहे. मुख्यालयातील इमारतीच्या डागडुजी करण्यासाठी राणेंनी इतक्‍या वर्षात कधीही निधी दिला नाही. त्यामुळे अवकळा आलेल्या घरात राहण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येत होती; मात्र आता ह्या घराचे नूतनीकरण केले जाणार आहे.'' 

Web Title: deepak kesarkar & narayan rane politics