तूर्तास वेट अँड वॉच.. - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

सावंतवाडी ः वेंगुर्ले आणि सावंतवाडी पालिकेवर युतीचीच सत्ता येणार आहे. बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे सध्या वेट अँड वॉच करा. थोड्या दिवसांनंतर चित्र स्पष्ट होईल, असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.

केसरकर हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. या वेळी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी केसरकर म्हणाले, "आमच्या बाजूने बहुमत आहे. त्यामुळे कोण काय दावा करतो याला महत्त्व नाही. सावंतवाडीसह वेंगुर्लेतसुद्धा युतीचीच सत्ता असणार आहे. त्यामुळे अधिक काय सांगण्याची गरज वाटत नाही.''

विश्रामगृहावर येण्यापूर्वी केसरकर यांनी अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांची पुन्हा त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याबाबत त्यांना विचारले असता सगळेच पत्ते आता खोलणार नाही. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे निश्‍चितच फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.
श्री. केसरकर यांना पालिका निवडणुकीत मिळालेल्या पिछाडीबाबत छेडण्याचा प्रयत्न केला असता, त्याबद्दल आता काही बोलणार नाही असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी वैश्‍यवाडा चितारआळी भागातील नागरिकांनी पाणंदीच्या प्रश्नावरून केसरकर यांची भेट घेतली. या वेळी महिला अंकुर निवारा केंद्र अन्यत्र हलवून त्या ठिकाणी पाणंद रुंद करण्याची मागणी केली; मात्र प्रथम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून पुढील निर्णय घ्या, असे आदेश केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: deepak kesarkar says wait and watch