भाजपने गद्दारी केल्यानेच पराभव झाल्याचा सेनेच्या माजी आमदाराचा आरोप 

Defeat Due To BJP Traitor Ex MLA Sadanand Chavan Comment
Defeat Due To BJP Traitor Ex MLA Sadanand Chavan Comment

देवरूख ( रत्नागिरी ) - विधानसभा निवडणुकीत मित्र पक्ष भाजपने गद्दारी केली म्हणूनच इथे शिवसेनेचा पराभव झाल्याचा आरोप माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केला. तसेच आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचा टोलाही माजी आमदार चव्हाण यांनी लगावला. 

धामापूरतर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार शंकर भुवड यांनी 398 मतांनी विजय मिळवला. यानंतर येथील सभापती निवासमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी आमदार सुभाष बने, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, ऐश्वर्या घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, रोहन बने आदी उपस्थित होते. 

आजचा विजय छोटा पण आमच्यासाठी मोठा

चव्हाण म्हणाले, आजचा विजय छोटा असला तरी तो आमच्यासाठी मोठा आहे. याठिकाणी मित्र पक्षाने आमच्या विरोधात लढत दिली. आज त्यांना पडलेली मते आणि अन्य उमेदवाराला पडलेली मते पाहून विधानसभा निवडणुकीत कुणी गद्दारी केली ते स्पष्ट होते. त्यांच्या गद्दारीमुळे शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आज येथील जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे. मी विजयी झाल्यावर मला जेवढा आनंद झाला असता, त्यापेक्षाही अधिक आनंद आजच्या विजयाने झाला आहे. शेवटी प्रत्येकाच्या कर्माचे फळ मिळतेच. त्याची प्रचिती आज आल्याचे सांगत आज खरा चोर सापडला. जनता नेहमी शिवसेनेलाच कौल देते हे आजच्या निकालावरून आमचे सहकारी सहदेव बेटकर यांनाही समजले असेल असा टोलाही त्यांनी लगावला. 

आजचा विजय सेनेला नवीन उभारी देणारा

माजी आमदार सुभाष बने यांनी मित्र पक्षाने गद्दारी केली नसती तर आज इथे शिवसेनेचा आमदार असता. आजचा विजय हा शिवसेनेला नवीन उभारी देणारा ठरेल. यापुढेही असेच छोटे छोटे विजय आम्हाला गतवैभव प्राप्त करून देतील. आमच्या सदस्यांना जरी कमी कालावधी मिळणार असला तरीही कमी कालावधीत आमचा सदस्य विक्रमी कामे करेल. नवनिर्वाचित सदस्य शंकर भुवड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com