पराभूत उमेदवाराचे काँग्रेसकडून गोवळकोटमध्ये पुनर्वसन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

चिपळूण - गोवळकोट येथील काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. काँग्रेसने पराभूत झालेल्या उमेदवाराला स्वीकृत सदस्यपदाची संधी देत राष्ट्रवादीच्या खेळीला चोख प्रत्युत्तर दिले. 

चिपळूण - गोवळकोट येथील काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. काँग्रेसने पराभूत झालेल्या उमेदवाराला स्वीकृत सदस्यपदाची संधी देत राष्ट्रवादीच्या खेळीला चोख प्रत्युत्तर दिले. 

पालिका निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. काँग्रेसने दिलेल्या २२ उमेदवारांपैकी किमान ९ सदस्य निवडून येतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यामध्ये प्रभाग ८ मधील काँग्रेसचे उमेदवार हारून घारे हे निश्‍चित विजयी होतील, असा अंदाज काँग्रेसकडून बांधण्यात आला होता. श्री. घारे यांना राष्ट्रवादीनेही उमेदवारी देऊ केली होती. शाह यांनी दोन वर्षांपूर्वी घारे यांच्याशी बोलणी करून घारे यांचा शब्द घेतला होता. त्यामुळे श्री. घारे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली होती.

राष्ट्रवादीने सुरेश कदम बाहेरचा उमेदवार दिलेला असताना त्यांना ५३७ मते मिळाली. काँग्रेसचे घारे यांना दुसऱ्या क्रमांकाची ५७० मते आणि शिवसेनेचे भगवान बुरटे यांना ७०७ मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार शहाबुद्दीन सुर्वे यांना १४८० मते मिळाली होती. श्री. घारे आणि श्री. कदम यांच्या मतांची बेरीज केल्यानंतर ती ११०७ इतकी होते. त्यावरून राष्ट्रवादीची मते फुटल्याचा अंदाज बांधला जात आहे. मतमोजणीनंतर शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रवादीचा पराभूत उमेदवार शुभेच्छा देतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. राष्ट्रवादीच्या मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचा हक्काचा उमेदवार पराभूत झाल्याची चर्चा सुरू झाली. गोवळकोटमध्ये निवडणुकीत काँग्रेसचे प्राबल्य वाढले. पराभवाने कार्यकर्ते खचून जाऊ नयेत, म्हणून पराभूत उमेदवार श्री. घारे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देत त्यांचे पुनवर्सन करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणेंनी स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी दिली. या माध्यमातून मी शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सभागृहाला सूचना करेन. शहरात काँग्रेस वाढविण्यासाठी मी प्रयत्न करीन.
- हारुण घारे, स्वीकृत नगरसेवक, चिपळूण

Web Title: Defeated Congress candidate in the rehabilitation in govalkot