मालवण समुद्रात बुडाणाऱ्या दिल्लीच्या महिलेस वाचविले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

दिल्ली येथील पर्यटकांचा चमू चिवला बीच येथे आला होता. यात दुपारी बाराच्या दरम्यान कोमल गर्ग व त्यांच्या सहकारी समुद्रात उतरल्या होत्या. समुद्री लाटांच्या माऱ्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात ओढल्या जाऊन बुडू लागल्या.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या दिल्ली येथील पर्यटकांपैकी कोमल गर्ग (वय 43) चिवला बीच येथील समुद्रात बुडाल्याची घटना आज दुपारी बाराच्या दरम्यान घडली. स्थानिकांनी त्यांना तत्काळ समुद्रातून बाहेर काढत शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. सुरवातीस त्यांची प्रकृती चिंताजनक होती; मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना अधिक उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. 

हेही वाचा - कोणी केली मालवण नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ?

दिल्ली येथील पर्यटकांचा चमू चिवला बीच येथे आला होता. यात दुपारी बाराच्या दरम्यान कोमल गर्ग व त्यांच्या सहकारी समुद्रात उतरल्या होत्या. समुद्री लाटांच्या माऱ्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात ओढल्या जाऊन बुडू लागल्या. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना किनाऱ्यावर आणत तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात पोटात गेल्याने कोमल यांची प्रकृती चिंताजनक बनली होती; मात्र डॉक्‍टरांनी तातडीने उपचार केल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

हेही वाचा - देवगडची विरोधी बाकाची परंपरा कायम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Woman Rescue On Malvan Sea Beach