आंबेनळी अपघाताची सीआयडीमार्फत चौकशीची मागणी

चंद्रशेखर जोशी
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

दाभोळ - पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये   कृषी विद्यापीठातील ३० कर्मचारी मृत झाले होते. या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील व्यक्तींची महत्त्वपूर्ण बैठक आज जालगाव पांगारवाडीत झाली. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

या अपघाताबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे कुटुंबीय संभ्रमित झाले आहेत. अपघाताचा तपास करावा, या मागणीसाठी कर्मचार्‍यांचे कुटुंबीय एकत्र आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचीही भेट घेण्याचे ठरविण्यात आले. या 30 कुटुंबांना न्याय मिळावा, कोणीही राजकीय दबाव आणू नये व अपराध्याला शिक्षा व्हावी, या मुद्द्यावर लढा देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. अपघाताप्रकरणी पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सहलीला गेलेली बस अपघातावेळी कोण चालवीत होते. यासंदर्भात आमच्या मनात शंका आहे. या संदर्भात आपण चौकशीची मागणी केली असून लवकरच रायगडचे पोलिस अधीक्षक सुनील पारस्कर यांची भेट घेऊन या अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी लेखी मागणी आम्ही करणार आहोत.

- पी. एन. चौगुले, हर्णै

Web Title: demand of Ambenali accident inquiry