चिनी माल नको आम्हाला! भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी 

अमित गवळे
रविवार, 17 मार्च 2019

पाली (रायगड) : होळी व धुलिवंदनासाठी जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, बाजारातून चिनी माल हद्दपार झाला आहे. सध्या भारतीय बनावटीच्या स्वदेशी व टिकाऊ मालाला अधिक मागणी आहे. तसेच इकोफ्रेंडली (पर्यावरण पुरक) रंगाना जास्त पसंती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पिचकारी व रंगाच्या किंमतीत जवळपास ३० ते ५० टक्यांनी वधारल्या आहेत.

मुंबईला घाऊक बाजारात देखील बहुतांश ठिकाणी चिनी मालावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. स्थानिक बाजारपेठेत देखील अनेक दुकानदारांनी चिनी माल न विकण्याचे ठरविले आहे. चिनी माल स्वस्त असला तरी तो निकृष्ट दर्जाचा आहे. त्या तुलनेत भारतीय माल महाग असला तरी तो टिकाऊ आहे. तसेच चिनकडे भारतीय गंगाजळी जाऊ नये यासाठी ग्राहक देखील स्वदेशी मालाला पसंती देत आहेत. यामुळे भारतीय उत्पादक व विक्रेत्यांना मात्र अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. 
 
इकोफ्रेंडली (पर्यावरण पुरक) रंग हवे.
ऑईलपेंट तसेच इतर घातक रासायनांनी बनलेले रंग देखील बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात हद्दपार झाले आहेत. त्या ऐवजी इकोफ्रेंडली (पर्यावरण पुरक) रंगाना मागणी वाढली आहे. बाजारात देखील सुके आणि साध्या प्रकारचे रंग उपलब्ध आहेत. 
 
''चिनी माल न विकण्याचे ठरविले आहे. ग्राहक सुद्धा स्वदेशी मालच खरेदी करत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पिचकाऱ्या व रंगाच्या किंमती वाढल्या आहेत.''
रुपेश ठाकूर, विक्रेते, पाली

''चायना माल स्वस्त असला तरी भारतीय बनावटीचा मालच खरेदी करतो. प्रत्येकानेच स्वदेशी माल वापरला पाहिजे.''
- सरफुद्दीन रहीम खान्देशी, ग्राहक, पाली
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Chinese goods is decreased and increased for Indian product for Hoili