कलिंगड उत्पादकांना भरपाई देण्याची मागणी 

Demand Of Compensation To Watermelon Growers
Demand Of Compensation To Watermelon Growers

कुडाळ ( सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील कलिंगड उत्पादकांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याकरिता धोरण तयार करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली आहे. 

जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल अखेरपर्यंत विविध भागात कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे कलिंगड केवळ जिल्ह्यातच नव्हे तर गोवा तसेच राज्याच्या अन्य भागात देखील विक्री करता पुरवठा केले जाते. जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी व महिला बचत गटांच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरती स्टॉल लावून याची विक्रीदेखील केली जाते; मात्र गेल्या वीस दिवसांपासून करोना व्हायरसच्या संकटामुळे व संचारबंदीमुळे या कलिंगडाच्या मागणीत व विक्रीत सुमारे 95 टक्के घट झालेली आहे. यामुळे विक्री करता तयार झालेले कलिंगड हे शेतकऱ्याला डोळ्यादेखत फेकून द्यावे लागणार आहे किंवा गुरांना तरी घालावे लागणार आहे.

जिल्ह्यातील शेतकरी हे आपल्या परसदारी किंवा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये या कलिंगडाची लागवड करत असतात. ही कलिंगड तयार करण्याकरता बियाणी - रोपे, सिंचन सुविधा, फवारणी, कीटकनाशके व अन्य खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो; मात्र या कलिंगड उत्पादकांच्या मालाला बाजारपेठ न मिळाल्यास जिल्ह्यातील या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.

आंबा - काजू या पिकांची शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद असते. काही कारणामुळे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद देखील असते; मात्र या कलिंगड उत्पादकांची कुठल्याही प्रकारची नोंद सातबारावर नसल्यामुळे भविष्यात त्यांना नुकसान भरपाई देणे देखील शक्‍य होणार नाही. सध्या संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी असल्याने या शेतकऱ्यांनी आपला माल बाजारपेठेत विक्रीस आणला तरी त्यांना ग्राहक मिळण्याची शक्‍यता फार कमी आहे. त्यामुळे शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून ग्रामपंचायत पातळीवर या शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई देण्याकरता धोरण तयार करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देसाई यांनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com