नगरसेवकांच्या मानधन वाढीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सावंतवाडी : खासदार, आमदारांना मोठ्या प्रमाणात मानधन मिळते; मात्र नगरसेवकांना शंभर रुपये मानधन देऊन शासन त्यांची बोळवण करत आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक राजू बेग यांनी एक तर मानधन वाढवा, अन्यथा शंभर रुपये सुद्धा जमा करून घ्या, अशी मागणी आज पालिकेच्या बैठकीत करीत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. त्यांच्या भूमिकेला शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा देत अनुमोदन असल्याचे सांगितले.

यावेळी नगरसेवक डॉ. जयंत परूळेकर यांनी वित्तमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर तुमचे आहेत, ते नगराध्यक्ष राहिले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनच पाठपुरावा करून घ्या असा चिमटा काढला. येथील पालिकेची मासिक बैठक आज येथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. आयत्या वेळच्या विषयात बेग यांनी नगरसेवकांच्या मानधनाचा मुद्दा उचलून धरला. शासन नगरसेवकांना 100 रुपये मानधन देऊन त्यांची बोळवण करत आहे. प्रत्यक्षात पालिका क्षेत्रात काम करणारे नगरसेवक आपला अमूल्य वेळ इथे देत आहे. महिला नगरसेवकांना मतदार संघात फिरण्यासाठी रिक्षाला दोन ते तीन हजार खर्च येत आहे.

अशा परिस्थितीत नगरसेवकांचे मानधन वाढणे गरजेचे होते; परंतु खासदार, आमदारांनी आपले मानधन वाढून घेतले. प्रत्यक्षात मात्र नगरसेवकांकडे कोणी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शंभर रुपये देण्यात येणारे मानधन शासनाने आपल्याकडे जमा करून घ्यावे. अन्य काही गोष्टींसाठी त्याचा उपयोग करता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला याला. विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांची समवेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष यांनीही याला अनुमोदन दिले. त्यांचे मानधन वाढ गरजेचे आहे, अशी मागणी केली. नगरसेवकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. येत्या काही दिवसात त्यावर विचार होण्याची शक्यता आहे, असे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सभागृहाला सांगितले.

Web Title: Demand for honorarium of corporators