कल्याण-सावंतवाडी रेल्वेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

दिवा पॅसेंजर सकाळी ६.२० ची गाडी असल्याने कोकणात येण्यासाठी कर्जत, कसारा, भागातील लोकाना शक्‍य होत नाही. कल्याण-सावंतवाडी पॅसेंजरसाठी ठाणे जिल्हा परिषदकडे ठरावही पास झाला; मात्र संबंधितांनी सकारत्मकता दाखविली नाही. 
- सुनील उतेकर, संस्थापक अध्यक्ष, कल्याण ते 
सावंतवाडी पॅसेजर समिती.

सावंतवाडी - कोकणात जाण्यासाठी कल्याण जंक्‍शन येथून कोकणात सावंतवाडी रेल्वेस्टेशनला जाणारी पॅसेजर गाडी सोडावी, अशी दोन वर्षांपासूनची कोकणवासीयांची मागणी आहे. सतत पाठपुरावा करुनही मागणी पूर्ण केली नसल्याने ही गाडी कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

डोंबविली, भिवंडी, कर्जत, कल्याण परिसरात कोकणवासियांची संख्या फार मोठी आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जाण्यासाठी या परिसरातील लोकांना थेट ठाणे गाठावे लागत आहे. दिवा स्टेशनमधून सुटणारी दिवा सावंतवाडी ही गाडीही गैरसोयीची ठरत असल्याने कल्याण जंक्‍शन येथून दोन वर्षांपासून कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर ही गाडी सुरु करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या मागणीला कोकणवासीय जनता, सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. कोकण मार्गावरील मुंबईहून जाणाऱ्या गाड्या वर्षाच्या बाराही महिने भरुन जातात. मे महिना. दिवाळी, चतुर्थी, होळी या सणांच्या कालावधीत तर गाड्या अपुऱ्या ठरतात. एवढी गर्दी असूनही आरक्षीत डबेही बुकींगसाठी भेटत नाही.

कर्जत, कल्याण, डोंबविली या भागातील लोकांना कोकणात जाण्यासाठी थेट ठाणे गाठावे लागते. कल्याण जंक्‍शनहून सावंतवाडीपर्यंत एखादी पॅसेंजर गाडी सुरु झाली तर कल्याण, कर्जत, कसारा पर्यंतच्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर चालू करण्याच्या मागणीला पुर्ण करण्यासाठी कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर समितीने लोकप्रतिनीधींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न केले तसेच पत्रव्यवहार अनेक वेळा केला. त्या भागातील लोकप्रतिनीधींनी या मागणीला पाठींबा देत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. या भूमिकेमुळे मागणीला गती मिळून यंदा एप्रिल-मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर सुरु होणार, अशी आशा असताना वांद्रे येथून कोकणमार्गे मेंगलोरला जाणारी गाडी सुरु झाली; मात्र ज्या गाडीची मागणी महत्वाची समजली जात होती ती पूर्ण झाली नाही. 

कल्याण-सावंतवाडी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिले आहे. याची दखल घेऊन या हंगामात प्रायोगिक तत्वावर रेल्वे सोडावी.
- अभिमन्यू लोंढे
, जिल्हा सल्लागार कल्याण-सावंतवाडी रेल्वे पॅसेंजर समिती.

दिवा पॅसेंजर सकाळी ६.२० ची गाडी असल्याने कोकणात येण्यासाठी कर्जत, कसारा, भागातील लोकाना शक्‍य होत नाही. कल्याण-सावंतवाडी पॅसेंजरसाठी ठाणे जिल्हा परिषदकडे ठरावही पास झाला; मात्र संबंधितांनी सकारत्मकता दाखविली नाही. 
- सुनील उतेकर,
संस्थापक अध्यक्ष, कल्याण ते 
सावंतवाडी पॅसेजर समिती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand of Kalyan-Sawantwadi rail