बांद्यात कृषीमालावरील कर आकारणी थांबवण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

बांदा - कृषी उत्पादनांना कर लावता येत नाही. मात्र बांदा ग्रामपंचायत येथील आठवडा बाजारात विक्रीसाठी कृषी उत्पादने घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांकडून कर वसूल करत आहे. ही वसूली त्वरीत थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज येथील सरपंच मंदार कल्याणकर यांच्याकडे केली. 

सरपंच कल्याणकर यांची जिल्हा बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष विजयकुमार मराठे, शेती उत्पादक संघाचे सचिव विष्णू देसाई, सिंधुदुर्ग कृषी प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष सिध्देश देसाई आणि तळकटचे माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश वेटे यांनी भेट घेतली व निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, येथील सोमवारच्या आठवडा बाजारात शेतकऱ्यांकडून अवाजवी व अन्यायकारकरीतीने कर वसूली केली जाते. याशिवाय वसुली ठेकेदाराच्या दादागिरीने शेतकरी हैराण झाले आहेत. कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढते, हे खरे असले तरी शेतकऱ्यांकडून थेट वसूल करण्यात येणारा हा कर कायद्याला धरून नाही. शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा कर, शुल्क वसूल करू नये असे ग्रामपंचायत नियमावलीत म्हटले आहे.

मुंबई ग्रामपंचायत नियमातील निकषानुसार आठवडा बाजार शुल्क या मथळ्याखाली शेती उत्पान्नावर कर आकारणी करू नये असे स्पष्टपणे नमुद आहे. तरीही ग्रामपंचायतीकडून नेमलेल्या ठेकेदाराकडून मनमानीपणे थेट शेतकऱ्यांकडून कर वसूल केला जातो. यासाठी दमदाटी केली जाते. नारळ, काजू, केळी आणि सुपारी उत्पादक व्यापारासाठी अवघी काही मिनिटे राज्यमहामार्ग लगतच्या जागेचा वापर करतात.

ग्रामपंचायतीच्या कोणत्याही जागेचा यासाठी वापर केला जात नाही. शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीकडून कोणतीही सेवा सुविधा दिली जात नाही. असे असतानाही करण्यात येणारी ही कर आकारणी त्वरीत बंद करावी अशी मागणी यातून केली आहे. 

Web Title: demand to stop tax on Agriculture product