देवगड पंचायतीचा कारभार लोकाभिमुख करणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

देवगड - येथील देवगड - जामसंडे नगरपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या शहर विकासासाठी आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली. नगरपंचायतीचा कारभार स्वच्छ, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी ही संकल्पना असल्याचे श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, समिती सदस्यांचा सत्कार श्री. राणे यांच्या हस्ते झाला.

येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या माध्यमातून होणारा शहराचा विकास नियोजनबद्ध व्हावा या हेतूने विविध क्षेत्रांतील स्थानिक मंडळींशी श्री. राणे यांनी चर्चा केली. त्यानंतर स्थानिकांचा समावेश असलेल्या या समितीची माहिती देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, बाळ खडपे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, डॉ. मिलिंद कुळकर्णी, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्‍वर खवळे उपस्थित होते. 

श्री. राणे म्हणाले, ‘‘शहराच्या विकासामध्ये स्थानिकांच्या संकल्पना असाव्यात, या हेतूने समिती निवडली आहे. नगरपंचायत रचनेमधील विविध विभागांचा कारभार लोकाभिमुख होण्यासाठी, नवनवीन विकासात्मक कल्पना मांडण्यासाठी, सूचना व मार्गदर्शन करण्याचे काम ही समिती करेल. या समितीची नगरसेवकांशी बैठक होऊन त्यातून विकासात्मक चर्चा घडवून आणली जाईल.’’ 

यावेळी जाहीर केलेल्या समितीमध्ये प्रा. नागेश दप्तरदार, शामल जोशी, भाई खोबरेकर, संजीव राऊत, अमोल जामसंडेकर, चारुदत्त सोमण, ॲड. कौस्तुभ मराठे, निशिकांत साटम, प्रसाद पारकर, प्रमोद नलावडे, संदीप कुळकर्णी, शैलेश कदम, डॉ. सुनील आठवले, मिलिंद कुबल यांचा समावेश आहे. 

तसेच नगरपंचायतीच्या रचनेनुसार महिला व बालकल्याण समिती, सार्वजनिक बांधकाम, जलनिःसारण समिती, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, क्रीडा समिती, नियोजन आणि विकास, वीज, पर्यटन, पाणीपुरवठा समितीनुसार नियुक्‍त केलेल्या सदस्यांची नावे घोषित केली.

Web Title: Deogarh - jamasande Nagar Panchayat