कणकवली : एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन खात्यात जमा

सिंधुदुर्गात एसटी बस सेवा सुरू
कणकवली : एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन खात्यात जमा
कणकवली : एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन खात्यात जमाsakal

कणकवली : एसटी महामंडळातील सिंधुदुर्ग विभागातील २१४६ कर्मचाऱ्यांना आज सुधारित वेतन श्रेणी प्रमाणे मागील नोव्हेंबर महिन्याचे वेतन जमा करण्यात आले आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना पगार देऊन पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. कणकवली ते फोंडा अशी एसटी बस आज दुपारी बारा वाजता सोडण्यात आली.

सिंधुदुर्ग एसटी विभागांमध्ये नियमित २१०० बसफेऱ्या धावत होत्या. मात्र, कोरोना कालावधीमध्ये १५०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. या विभागाकडे २१४६ कर्मचारी होते. संपकाळात त्यातील काही कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर काही ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सध्या स्थिती एसटी विभागाकडे १९९५ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, १४५४ कर्मचारी हे संपाच्या बाजूने आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यात वेतन श्रेणी वाढविणे बाबतची घोषणा यापूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरच्या पगारापासून झाली आहे.

कणकवली : एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन खात्यात जमा
खारघर : मालमत्ता करामुळे नगरसेवक अडचणीत

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी या विभागांमध्ये ८ नोव्हेंबर पासून संप पुकारला. याला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. तत्पूर्वी जे कर्मचारी १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये सेवा बजावली होती. अशा सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारित पद्धतीने अदा करण्यात आले आहे अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटीची पहिली बस सेवा सोमवारी (ता. ६) दुपारी दोन वाजता कणकवली ते सावंतवाडी या मार्गावर सोडण्यात आली. या बससेवेमधून २४ प्रवाशांनी लाभ घेतला. दरम्यान आज कणकवली ते फोंडा या मार्गावर एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न झाला. या बसमध्ये ही किरकोळ प्रवासी होते. कणकवली ते फोंडा या मार्गावर जे प्रवासी एसटीला हात दाखवतील त्यांना पुढे घेऊन जाणार आहेत. त्यानंतर फोंडाघाट येथून परतीचा प्रवास कणकवलीच्या दिशेने होणार आहे.

यासाठी एसटी महामंडळाने आपली एक जीप गाडी पायलट म्हणून ठेवली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही असंतोष आहे. त्यामुळे चालक आणि वाहक सेवेत रुजू होऊ शकलेले नाहीत. चालक आणि वाहकांची नोव्हेंबर ची सेवा लक्षात घेऊन त्यांच्या खात्यामध्ये आज सुधारित वेतन जमा करण्यात आले आहे. मात्र, सुधारित वेतन जमा होऊन आज दुपारपर्यंत एसटीचे चालक आणि वाहक सेवेत रुजू न झाल्याने एसटी विभागातील एक एसटी बस वगळता इतर फेऱ्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय सुरू आहे. याचा लाभ मात्र अवैध प्रवासी वाहतूकदार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com