डेरवणमध्ये उद्यापासून ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सावर्डे - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने रिओ स्पर्धेत खेळलेले शटल, मेरी कोमने सरावासाठी वापरलेले ग्लोव्हज्‌, लिएंडर पेसने विक्रमी ७ वे ऑलिम्पिक खेळताना मारलेला टेनिसचा चेंडू, खाशाबा जाधव आणि बाबू निमल यांनी जिंकलेले ऑलिम्पिक पदक हा ऑलिम्पिकचा खजिना कोकणवासीयांना ९ मार्चपासून डेरवण यूथ गेम्सच्या निमित्ताने भरविण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनात पाहाण्याची पर्वणी लाभणार आहे. 

सावर्डे - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने रिओ स्पर्धेत खेळलेले शटल, मेरी कोमने सरावासाठी वापरलेले ग्लोव्हज्‌, लिएंडर पेसने विक्रमी ७ वे ऑलिम्पिक खेळताना मारलेला टेनिसचा चेंडू, खाशाबा जाधव आणि बाबू निमल यांनी जिंकलेले ऑलिम्पिक पदक हा ऑलिम्पिकचा खजिना कोकणवासीयांना ९ मार्चपासून डेरवण यूथ गेम्सच्या निमित्ताने भरविण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनात पाहाण्याची पर्वणी लाभणार आहे. 

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. करण्यात आले आहे. ९ ते १५ मार्च २०१७ या कालावधीत डेरवण येथील क्रीडा संकुलात हा महोत्सव पार पडेल. या महोत्सवाच्या निमित्ताने ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात १०० पेक्षा अधिक दुर्मिळ छायाचित्रे आणि ३० ऑलिम्पिकच्या संग्राह्य वस्तू प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासह ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनाचे उद्‌घाटन १९६० च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये धावलेले ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर, सिडनीसह सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेली महिला नेमबाज अंजली भागवत-वेदपाठक, रिओ ऑलिम्पिकमध्ये राईंगमध्ये चमक दाखविणारा दत्तू भोकनाल यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टचे काका महाराज जोशी, ऑलिम्पिक क्रीडापत्रकार संजय दुधाणे, रणजित खाशाबा जाधव, अजित बाबू निमल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. 

भारताने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले पहिले खाशाबा जाधव यांचे १९५२ हेलसिंकी स्पर्धेतील कांस्यपदक, मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या बाबू निमल यांनी १९३६ बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले हॉकीतील सुवर्णपदक, पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत खेळलेले व तिची स्वाक्षरी असलेले शटल, मेरी कोमने ऑलिम्पिकच्या सरावासाठी वापरलेले ग्लोव्हज्‌ तिच्या शुभेच्छांच्या सहीसह तसेच रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसच्या लढतीत लिएंडर पेसने खेळलेला चेंडू प्रदर्शनात पाहता येणार आहे. तसेच लंडन व रिओ ऑलिम्पिकची स्मृतिचिन्हे, चलनी नाणी, पोस्टाची तिकिटे येथे ठेवण्यात येणार आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये १९०० ते २०१६ पर्यंतच्या गेल्या ११६ वर्षांत भारताने जिंकलेल्या पदकांची माहिती, संजय दुधाणे यांचे ऑलिम्पिकमधील भारत हे छायाचित्रांचे प्रदर्शन, त्यांनी संग्रहित केलेल्या २५ पेक्षा अधिक ऑलिम्पिक वस्तू पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज्‌ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Deravana inspired performance in the Olympic Games from tomorrow