राजकीय अनास्थेने रखडला विकास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

राजापूर - विविध कारणांमुळे राजापूर शहराचा विकास रखडला आहे. भूसंपादन, आर्थिक तरतुदी आणि लोकप्रतिनिधींसह लोकांमध्ये विकासाबाबत असलेली अनास्था आदी विविध कारणांमुळे गेल्या अनेक दशकांपासून मंजुरी मिळूनही रखडलेल्या शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला जनतेसह लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक मानसिकतेसह आर्थिक निधीची गरज आहे.

राजापूर - विविध कारणांमुळे राजापूर शहराचा विकास रखडला आहे. भूसंपादन, आर्थिक तरतुदी आणि लोकप्रतिनिधींसह लोकांमध्ये विकासाबाबत असलेली अनास्था आदी विविध कारणांमुळे गेल्या अनेक दशकांपासून मंजुरी मिळूनही रखडलेल्या शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला जनतेसह लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक मानसिकतेसह आर्थिक निधीची गरज आहे.

शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी तब्बल ४१ वर्षांपूर्वी म्हणजे १९७६ मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला. नगर रचना विभागाने तयार केलेल्या आरक्षण मसुद्यांच्या साह्याने हा आराखडा तयार करण्यात आला. आराखड्याला मंजुरी देताना लोकांच्या हरकती, सूचना, दावेही मागविण्यात आले होते. त्यानंतर वीस वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा विकास आराखड्यात सुधारणा करण्यासाठी लोकसहभाग घेण्यात आला. त्यानंतर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला; मात्र अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत. अविकसित आरक्षणे, तांत्रिक मुद्द्यामध्ये अकडलेली विकासकामे, निधीच्या कमतरतेमुळे आराखडा अडकला आहे.

पालिकेने काही आरक्षणे विकसित केली असली, तरी अद्यापही ॲग्रिकल्चर मार्केट (गुरववाडी), प्राथमिक शाळा, प्ले ग्राउंड (गुरववाडी), गार्डन (गुरववाडी), म्यु.पल हाउसिंग इस्टेट (बंगलवाडी), प्ले ग्राउंड (बंगलवाडी), गार्डन (बंगलवाडी), प्लेग्राउंड (बंगलवाडी), प्लेग्राउंड (बंगलवाडी), प्राथमिक शाळा (कोंढेतड), प्राथमिक शाळेसाठी वाढीव क्षेत्र (कोंढेतड),  कत्तलखाना (कोंढेतड), दफनभूमी वाढीव क्षेत्र (कोंढेतड), शॉपिंग सेंटर (कोंढेतड), पार्किंग (कोंढेतड), कंपोस्ट डेपो (कोंढेतड), मुलांचे मैदान (धोपटेवाडी), म्यु.पल स्टाफ क्वार्टर (दिवटेवाडी), गार्डन (दिवटेवाडी), मुलांचे खेळाचे मैदान (दिवटेवाडी), प्ले ग्राउंड (रानतळे दिवटेवाडी), शॉपिंग सेंटर (साखळकरवाडी), खेळाचे मैदान (साखळकरवाडी), प्राथमिक शाळेसाठी वाढीव क्षेत्र (आंबेवाडी), रिक्रिएशन (जुनी कचेरी), म्यु.पल. वापराकरिता (साखळकरवाडी), म्यु.पल खुले मार्केट (जुनी मासळी मार्केट), म्यु.पल वापराकरिता (पुंडलिक मंदिरासमोर), पार्क ॲण्ड प्ले ग्राउंड (राजीव गांधी क्रीडांगणाजवळ), पार्क (कोर्टाजवळ), प्राथमिक शाळा (तहसीलमागे), स्पोर्ट ॲण्ड शॉपिंग सेंटर (कोर्टाजवळ), म्यु.पल मार्केट (एस.टी.डेपो), शॉपिंग (गुरववाडी), पुनर्वसनकरिता (गुरववाडी) ही आरक्षणे अद्यापही विकसित झालेली नाहीत.

विकास योजनेतील आरक्षणाचा तपशील
खासगी जागेवरील 
आरक्षणे    ४०
पालिका मालकीच्या जागेवरील 
आरक्षणे    १४
 

दृष्टिक्षेपात शहर विकास आराखडा 
१) पालिकेने विकसित करावयाची आरक्षणे    ५०                               
२) शासकीय संस्थांनी विकसित करावयाची आरक्षणे    ८                            ३) खासगी संस्थांनी विकसित करावयाची आरक्षणे    २      

Web Title: development stop by politician