चिपळुणच्या सभेत मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेबाबत मौन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

तब्बल तीन तास उशीर ः भाजपला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन

चिपळूणः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूणच्या सभेत शासकीय योजनांचा पाढा वाचला. संपूर्ण भाषणात शिवसेनेवर जाहीर टीका करण्याचे त्यांनी टाळले. मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली. तब्बल दोन तास त्यांच्या भाषणाची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली आणि सुरक्षा यंत्रणेवरही ताण पडला.

शहरातील भोगाळे परिसरातील जोशी मैदानावर दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंडपात 2 हजार 500 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. सकाळी 11 वाजल्यापासून जिल्ह्यातून कार्यकर्ते येण्यास सुरवात झाली. सभेच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून वाहन पार्किंगची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. सभेची वेळ टळून गेल्यानंतर नागरिकांमध्ये कुजबूज सुरू झाली. मुख्यमंत्र्यांना झालेला उशिर आणि उन्हाच्या झळा असा कार्यकर्त्यांना दुहेरी घाम फुटत होता. तब्बल तीन तासानंतर मुख्यमंत्र्यांचे चिपळुणात आगमन झाले. अडीच वाजता ते सभेच्या ठिकाणी आले.

जिल्ह्यात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत आहे. जिल्हा परिषदेच्या 55 जागेसाठी भाजपने उमेदवार उभे करून शिवसेनेची डोकेदुखी वाढवली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजप विरूद्ध शिवसेना राजकीय युद्ध रंगले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री चिपळूणच्या सभेत शिवसेनेवर टीका करतील. असे सर्वांना वाटले होते. परंतु 25 मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांनी सेनेविरोधात शब्दही काढला नाही. भाजप ही विकासाची बॅंक आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. "रत्नागिरी जिल्हा परिषदेत तंगडीत तंगडी नको' भाजपला एकहाती सत्ता द्या असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Web Title: devendra fadnavis silence on shivsena