देवगडात 11 हजार मतदार ठरवणार सत्ताधीश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

अमृतमहोत्सवी वर्षात नगरपंचायत
स्वातंत्र्यापूर्वीपासून देवगड व जामसंडे या दोन्ही ग्रामपंचायती कार्यरत होत्या. 26 मार्च 1941 ला देवगड तर 28 मार्च 1941 ला जामसंडे ग्रामपंचायतीची स्थापना झाली. यंदाच या दोन्ही ग्रामपंचायतींना 75 वर्षे पूर्ण झाली. अमृतमहोत्सवी वर्षातच त्यांचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले.

देवगड-  येथील नवनिर्वाचित देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत एकूण 11 हजार 206 मतदार सत्ताधीश ठरवणार आहेत. एकूण 17 प्रभागात सर्वाधिक मतदार प्रभाग 11 मध्ये 872 इतके असून सर्वात कमी मतदार प्रभाग 15 मध्ये 436 इतके आहेत. त्यानुसार जिंकून येण्यासाठी मतदारसंघनिहाय आकडेवारीच्या अभ्यासावर अधिक भर द्यावा लागणार आहे.

देवगड व जामसंडे या दोन ग्रामपंचायतीची मिळून नगरपंचायत झाली. तत्कालीन देवगड ग्रामपंचायतीचे 6 वॉर्ड व सदस्य संख्या 17 होती. गावातील वाडी व नगरांची संख्या 19 इतकी होती. तर जामसंडे ग्रामपंचायतीचे 5 वॉर्ड व सदस्य संख्या 15 होती. गावातील वाडी व नगरांची एकूण संख्या 31 इतकी होती. आता नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागाची मिळून 15 हजार 957 इतकी लोकसंख्या असून एकूण 11 हजार 206 मतदार आहेत. यामध्ये 5 हजार 663 स्त्री तर 5 हजार 543 इतके पुरुष मतदार आहेत. प्रभागनिहाय मतदार असे, प्रभाग 1 - 333 स्त्री, 335 पुरुष (एकूण 668 मतदार) प्रभाग 2 - 251 स्त्री, 237 पुरुष (488) प्रभाग 3 - 332 स्त्री, 315 पुरुष (647) प्रभाग 4 - 381 स्त्री, 369 पुरुष (750) प्रभाग 5 - 252 स्त्री, 238 पुरुष (490) प्रभाग 6 - 339 स्त्री, 329 पुरुष (668) प्रभाग 7 - 407 स्त्री, 395 पुरुष (802) प्रभाग 8 - 392 स्त्री, 340 पुरुष (732) प्रभाग 9 - 252 स्त्री, 288 पुरूष (540) प्रभाग 10 - 393 स्त्री, 411 पुरूष (804) प्रभाग 11 - 441 स्त्री, 431 पुरुष (872 ) प्रभाग 12 - 415 स्त्री, 391 पुरुष (806) प्रभाग 13 - 270 स्त्री, 267 पुरुष (537) प्रभाग 14 - 245 स्त्री, 238 पुरुष (483) प्रभाग 15 - 218 स्त्री, 218 पुरुष (436) प्रभाग 16 - 398 स्त्री, 375 पुरुष (773) प्रभाग 17 - 344 स्त्री, 366 पुरुष (710).
 

Web Title: devgad to decide ruler

टॅग्स