धबधब्याआधी धरणासाठी सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

देवरूख - मार्लेश्‍वर धबधब्याच्या आधी छोटे धरण बांधण्याच्या प्रस्तावाला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. धरण बांधण्याच्या दृष्टीने वन खात्याच्या या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. मार्लेश्‍वरचा धबधबा बारमाही प्रवाहित राहावा आणि संरक्षित क्षेत्रातील वन्यप्राण्यांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ. मुग्धा जागुष्टे यांनी पालकमंत्र्यांपुढे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर त्यांनी आदेश दिले. 

पालकमंत्री विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी काल (ता. २७) श्री क्षेत्र मार्लेश्‍वर येथे आले होते. त्यांच्यासह  जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, पंचायत समिती सभापती सारिका जाधव, उपसभापती दिलीप सावंत, तालुकाप्रमुख प्रमोद पवार शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भूमिपूजनानंतर या प्रस्तावावर चर्चा करताना पालकमंत्र्यांनी मार्लेश्‍वर येथील भौगोलिक स्थिती जाणून घेतली. धरण बांधल्यास होणारे फायदे जाणून घेतले. हा प्रस्ताव नावीन्यपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. 

धबधब्याआधी छोट्याशा धरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघेलच, शिवाय धबधबाही बारमाही प्रवाहित राहिल्याने उन्हाळी हंगामात येथे पर्यटक वाढतील त्याचा फायदा स्थानिकानांच होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मार्लेश्‍वरच्या मूळ मठाच्या जीर्णोद्धारासंदर्भातील जागुष्टे यांच्या प्रस्तावानंतर त्यांनी आंगवली मठाला भेट दिली. या मठाचे माहात्म्य कळल्यावर त्यासाठीही जादा निधी देण्याची ग्वाही दिली. मी मंत्री असेपर्यंत हाही प्रस्ताव मार्गी लावेन, असे आश्‍वासन दिले. आमदार सदानंद चव्हाण यांनीही पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: devrukh konkan news dam survey before waterfall