गडनदीचा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण होणार - विजय शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यातील गडनदी प्रकल्पाच्या अपूर्णत्वाबाबत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत सातत्याने आवाज उठवला. त्याची दखल घेत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदार जाधव यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीत जाधव यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने गडनदी प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न मार्गी लागून प्रकल्पही पूर्णत्वास जाण्याचे संकेत आहेत. 

मुंबईत झालेल्या बैठकीला जलसंपदाचे मुख्य अभियंता के. एच. अन्सारी, उपसचिव धरणे, अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत संगमेश्‍वर तालुक्‍यातील गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यासह अनेक प्रश्‍न जाधव यांनी उपस्थित केले. त्यावर प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी २५ कोटी रुपये इतक्‍या निधीला तत्काळ मंजुरी देण्यात येईल असे सांगून हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण करू, असे आश्‍वासन शिवतारे यांनी दिले. त्याचबरोबर धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या जमिनी कसण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडे उपसा सिंचन योजना करून देण्याची मागणी केली होती. त्यासाठी शासनाने जमिनीच्या किमतीच्या ६५ टक्‍के रक्‍कम भरण्याच्या अटीवर ही योजना करून देण्याचे मान्य केले होते; मात्र ही अट शिथिल करून सदरची उपसा सिंचन योजना पूर्णतः शासनाच्या खर्चाने करून देण्याची मागणी जाधव यांनी केली. या मागणीलाही शिवतारे यांनी तत्काळ मान्यता दिली आणि तसे आदेश लवकरच देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

Web Title: devrukh konkan news gad river project complete in 1.5 year