पैसे मिळवून देणाऱ्या पिलसावर जाळे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

रापणीला जोर - नदी-खाडीतील मासळीलाही चांगला भाव

देवरूख - पावसाळी हंगामात मच्छीमारी बंद ठेवली जाते. नारळी पौर्णिमेपर्यंत मच्छीमार समुद्रात जात नाहीत. या कालावधीत मासळीला चांगला भाव मिळतो. या काळात मच्छीमारीवर आपला उदरनिर्वाह करणारा मच्छीमार समुद्रकिनारी जाळे लावून मच्छीमारी करतो. यालाच रापण किंवा पेरा असे म्हणतात. कोकणातील ठिकठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यांवर रापण पद्धतीच्या मासेमारीला आता जोर चढल्याचे पाहायला मिळत आहे. यात मिळणारा पिलसा चांगले पैसे मिळवून देतो.

पावसात समुद्रकिनाऱ्यावर रापण पद्धतीने मासेमारी केली जाते. सहा ते बारा मच्छीमार लांब जाळे घेऊन या जाळ्यांच्या दोन्ही बाजूंना मजबूत काठ्या बांधतात. दोघेजण जाळ्यांच्या टोकांना तर उर्वरित जाळ्याच्या जवळ ठराविक अंतर उभे राहतात. समुद्राच्या लाटेबरोबर किनाऱ्यावर येणारे मासे लाट परत जात असताना जाळे लाटेच्या तळात सोडून पकडले जातात. यामधून चांगला मासा जाळ्याला लागतो. या मच्छीमारीतून मिळणार पैसा रापण करणारे मच्छीमारसारख्या प्रमाणात वाटून घेतात.

सध्याच्या पावसाळी हंगामात पिलसा नावाचा मासा समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात येतो. या माशाची चव न्यारी असल्याने याला मागणीही मोठी असते. रापणमध्ये मिळणारा पिलसा मासा कोळीबांधवांना चांगले पैसे मिळवून देतो. रापण पद्धतीची मच्छीमारी अधिकतर संध्याकाळच्या सुमारास केली जाते. एकदा रापण केल्यावर दुसरी रापण साधारणतः एक तासाने केली जाते. या एक तासात जाळ्यातील सर्व मासे काढून ते विक्रीसाठी पाठवले जातात. आणि जाळं पुन्हा धुऊन साफसूफ केले जात. नदी आणि खाडीतील मच्छीमारी सुरू असल्याने यामध्ये मिळणाऱ्या मासळीच्या खरेदीसाठी मत्स्यप्रेमींची मोठी गर्दी होते. याबरोबरच समुद्रकिनारी सुरू असणारी रापण जीव धोक्‍यात न घालता कोळीबांधवांना चार पैसे मिळवून देते. सध्या कोकणच्या समुद्रकिनारी रापणला जोर भारी असल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे.

Web Title: devrukh konkan news net of money to the fish