सुधागड तालुका सरकारी कर्मचार्यांचा पाली तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा

अमित गवळे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पाली- आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मंगळवार (ता.७) पासून तीन दिवशीय लाक्षणिक संपावर गेले आहेत. सुधागड तालुक्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी पाली पंचायत समिती ते पाली सुधागड तहसिलकार्यालयावर मंगळवारी (ता.७) मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

पाली- आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मंगळवार (ता.७) पासून तीन दिवशीय लाक्षणिक संपावर गेले आहेत. सुधागड तालुक्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी पाली पंचायत समिती ते पाली सुधागड तहसिलकार्यालयावर मंगळवारी (ता.७) मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

आपल्या प्रलंबित मागण्या सरकारने तत्काळ मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी त्यांनी केली. सुधागड तालुक्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी संपात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. सरकारने आपल्या प्रमुख २४ मागण्या मान्य कराव्यात यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात आले असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. सरकारी कर्मचारी लाक्षणिक संपावर गेल्यामुळे नागरीकांची महत्वाची कामे रखडल्याने त्यांना या संपाचा मोठा फटका बसला आहे.

मोर्चात सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानिस, सचिव अण्णा गोरड, उपाध्यक्ष मोहन पवार, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सुधागड तालुका अध्यक्ष सचिन वाघ, सुधागड तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, सुधागड तालुका महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राकेश जंगम, रा.जि.प पंचायत समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नंदन पाटील उपाध्यक्ष शुभांगी खटावकर, रा.जि.प अलिबाग लेखा संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब देशमुख, सुषमा सिलीमकर, प्रशांत निकम, सुधागड तालुका भुमीअभलेखचे एस.एन. डांगे, महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक संघाचे सुधागड तालुकाध्यक्ष सुनिल भिलारे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सुधागड तालुका अध्यक्ष मोरेश्वर कांबळे, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रीय प्रमुख सभा शाखा सुधागडचे अध्यक्ष अनिल राणे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सुधागड ता.अध्यक्ष दिपक दंत, कोतवाल संघटना जिल्हाध्यक्ष हरिभाउ देशमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना सुधागड तालुका अध्यक्ष सचिन खारतोडे, राजेश गायकवाड यांच्यासह कृषी, शिक्षण,  आरोग्य, पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते. 

यावेळी सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने संपात सहभागी होत असल्याबाबत निवेदन तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांना निवेदन दिले. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Dhadak Morcha of Sudhagad Taluka Government employees shifted on Tahsil office