धनश्री गोडसे ठरली इंडियन फॅशन फिएस्टा मिस इंडिया

dhanshree godse
dhanshree godse

महाड - महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयाची माजी विद्यार्थीनी धनश्री धन्यकुमार गोडसे हिने फॅशन फिएस्टा मिस इंडियाचा किताब पटकविला. 2008 ते 2012 मध्ये महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयात ती शिकत होती.

धनश्रीचे वडिल धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल पोलिस ठाण्यात निरिक्षक म्हणून काम करत होते. पोलिस निरीक्षक असल्याने दहावीपर्यंत वेगळ्या 9 शाळेमध्ये धनश्रीचे शिक्षण झाले. चौथी ते सातवीचे शिक्षण तीने समर्थ विद्यालयात घेतले होते. धनश्रीला दहावीमध्ये 94 टक्के गुण मिळाले. सध्या ती भारती विद्यापीठ सांगली येथे एम.बी.बी.एस. दितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. इंडियन फॅशन फियास्टातर्फे जयपूर येथे मिस इंडिया 2019 ही स्पर्धा 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अशी पार पडली. या स्पर्धेमध्ये भारतातून विविध राज्यातून जवळपास सहा हजार पेक्षा जास्त स्पर्धकांमधून विविध राज्यातून निवडलेले अंतिम 27 स्पर्धक आले होते. 

या स्पर्धेदरम्यान स्पर्धकाच्या सौंदर्यासह हजरजबाबीपणा, त्यांचे व्यक्तिमत्त्व, धाडस व कपड्यांची निवड इत्यादी सर्व गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार केला जातो. अंतिम स्पर्धेत शिक्षण हे तलवारीपेक्षा सामर्थ्यवान आहे या उत्तरानेच धनश्रीच्या गळ्यात मिस इंडिया विजेतेपदाची माळ व मिस इंडियाचा मुकुट तिच्या डोक्यावर विराजमान झाला. 

एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची मुलगी ही या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची ही पहिली वेळ आहे. मिस युनिवर्स. मिस वर्ल्ड व मिस इंटरनॅशनल याकरता तीन वेगळ्या स्पर्धेमधून भारताचे प्रतिनिधित्व या मिस इंडिया करत असतात. धनश्री ही भारताचे प्रतिनिधित्व मिस इंटरनॅशनल या स्पर्धेमध्ये करेल मिस वर्ल्ड या स्पर्धेमध्ये  करणार आहे. मिस युनिव्हर्समध्ये मिस दिवा इंडिया ही भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 

त्यामुळे धनश्री ही आता जून-जुलैमध्ये जकार्तामध्ये होऊ शकणार्‍या इंडोनेशिया या देशांमध्ये मिस इंटरनॅशनल या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. ही स्पर्धा संपताच ज्वेलर्स लखनऊ यांनी दागिन्यांच्या जाहिरातीचा पाच लाख रुपयांचा करार धनश्री सोबत जाहीर केला आहे. 

या सगळ्यामध्ये धन्यकुमार गोडसे यांच्याबरोबर त्यांचे भाऊ ओम गोडसे, आई राजश्री गोडसे व मावशी जयश्री दोंड यांचे चांगले मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे मिस इंडियाचा किताब हा मी आई-वडिलांना अर्पण करते असे धनश्रीने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com