धनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ  व तालुका धनगर समाजाच्यावतीने येथील तहसिलदांराना देण्यात आले आहे.

कणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ  व तालुका धनगर समाजाच्यावतीने येथील तहसिलदांराना देण्यात आले आहे.

धनगर समाज डोंगरकपरीत राहत आहे. या समाजातील मुलांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. वाडीवस्तीवर अजून ही रस्ते, वीज नाही. देशभरातील धनगर समाजाची धनगर आणि धनगड अशी गफलत झाली. त्यामध्ये सुधारणा करावी अशी प्रमुख मागणी आहे. त्यामुळे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून जात प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मालोजी कोकरे, अनंत खरात, सखाराम खरात, शांताराम पटकारे, दिपक वरक, जनार्दन शेळके, विजय खरात, प्रकाश खरात, सत्यावान खरात, अंकूळ जंगले, सीताराम खरात आदी उपस्थित होते. 

Web Title: Dhangar Reservation agitation