जैताणे आरोग्य केंद्राचा परिसर एक दिवसात चकाचक

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जैताणे (ता. साक्री) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील अस्वच्छतेबाबत नुकतेच "जैताणे आरोग्य केंद्रामुळेच आरोग्य धोक्यात" हे वृत्त 'दैनिक सकाळ'ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने ताबडतोब जेसीबीद्वारा काल (ता. 17) एकाच दिवसात काटेरी झुडपे व गाजरगवत काढून घेत परिसर स्वच्छ व चकाचक केला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. जी. वळवी व लिपिक सूर्यवंशी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवून घेतली. यापूर्वीच स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून रुग्णालयाच्या दर्शनी भागातील परिसरात स्वच्छता मोहीम राबविली होती. ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनाच्या या स्वच्छता मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले असून यापुढेही परिसर स्वच्छतेची काळजी घेतली जावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.

डॉ. वळवी यांनीही यापुढे रुग्णालय परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले. शेजारीच असलेल्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय प्रशासनानेही रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Web Title: dhule marathi news sakal news impact jaitane health center clean up