पालीत बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची गैरसोय

अमित गवळे 
गुरुवार, 3 जानेवारी 2019

पाली - मैग्नेटिक स्ट्रिप डेबिट आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरनंतर बंद करण्यात आले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या ग्राहकांना ईएमवी चिप बेस्ड कार्ड घरपोच उपलब्ध करून दिलेत. मात्र येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत काही ग्राहकांना नव्याने मिळालेले ईएमवी चिप बेस्ड कार्ड बंद दाखवत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच बॅंकेचे देखील नुकसान आहे.

पाली - मैग्नेटिक स्ट्रिप डेबिट आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरनंतर बंद करण्यात आले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या ग्राहकांना ईएमवी चिप बेस्ड कार्ड घरपोच उपलब्ध करून दिलेत. मात्र येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत काही ग्राहकांना नव्याने मिळालेले ईएमवी चिप बेस्ड कार्ड बंद दाखवत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच बॅंकेचे देखील नुकसान आहे.

कार्ड-स्किमिंग, कार्ड क्लोनिंग, फ्रॉड इत्यादी प्रकारच्या धोक्यांपासून सुरक्षितता मिळावी यासाठी मैग्नेटिक स्ट्रिप कार्ड ऐवजी ईएमवी चिप बेस्ड डेबिट आणि क्रेडिट कार्डचा पर्याय सर्व बॅंकांनी स्वीकारला. बॅंक ऑफ इंडियाकडून बहुतांश ग्राहकांना पोस्टाने घरपोच ईएमवी चिप बेस्ड कार्ड पोहचले नाहीत. काही जण बॅंकेत विचारणा करण्यास आल्यानंतर त्यांना तेथे त्यांचे कार्ड दिले जात आहे. हे कार्ड सुरू (एक्टिव्हेट) करण्यास एटीएम मध्ये गेल्यास ते कार्ड बंद (हॉटलिस्टेड) असल्याची पावती बाहेर येते. मग नवीन कार्ड मिळालेला ग्राहक थबकून पुन्हा बॅंकेत विचारणा करण्यासाठी जातो. त्याला तुमचे नवीन कार्ड बंद असल्याचे किंवा ब्लॉक झाल्याचे सांगण्यात येते. आणि काही दिवसांनी तुमचे आणखी एक नवीन कार्ड घरी येईल असे सांगितले जाते. मात्र तो पर्यंत ग्राहकाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे कोणतेच व्यवहार करता येणार नाहीत. असा अनुभव अनेकांचा आहे. ग्राहकाकडे असलेले जुने आणि बंद पडलेले नवीन कार्ड काहीच उपयोगाचे नाही. 

रेडी किट संपले
नवीन कार्ड बंद असलेल्या ग्राहकांना ताबडतोब रेडी किट देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय थांबते आणि त्यांना त्वरित या कार्डद्वारे व्यवहार करता येतात. मात्र येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत हे रेडी किट सुद्धा संपले असल्याने ग्राहकांना कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नवीन कार्ड बनविण्यास बॅंकेला मोठा खर्च झाला आहे. त्यात काही कार्ड ब्लॉक किंवा बंद झाल्याने नव्याने कार्ड तयार करावे लागणार आहेत. आणि परिणामी बॅंकेला अधिकचा खर्च देखील होणार आहे. 

काहीच लोकांचे कार्ड ब्लॉक झाले आहेत. नवीन कार्ड ब्लॉक होणे ही तांत्रिक बाब आहे. ग्राहकांना लवकरच नवीन कार्ड उपलब्ध करून दिले जातील. तसेच रेडी किट सुद्धा काही दिवसांत येतील. 
- राजेंद्रप्रसाद गुप्ता, पाली - शाखा व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया

मला माझे नवीन डेबिटकार्ड येईल असा मेसेज आला आहे. मात्र अजूनही ते मिळाले नाही. जुन्या डेबिट कार्डद्वारे 1 तारखेपासून कोणतेच व्यवहार होत नाहीत. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
- अमित निंबाळकर, ग्राहक बॅंक ऑफ इंडिया.

Web Title: Disadvantage of Paliat Bank of India customers