आदिवासी बांधव, विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

अमित गवळे
शनिवार, 14 जुलै 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासन महसुल विभाग, तहसिल कार्यालय पाली-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासन महसुल विभाग, तहसिल कार्यालय पाली-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

सुशिक्षित युवकांनी पुढे येवून समाजात प्रबोधन घडवून आणले पाहिजे. तेथे लोकशिक्षणाची चळवळ वृध्दीगंत करण्याबरोबरच व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्थलांतर थांबविण्यासाठी आदिवासी बांधवांनी शासन योजने अंतर्गत उपलब्ध रोजंदारीचा वापर करावा तसेच मालकीची शेती करण्यावर भर द्यावा.  असे प्रांताधिकारी बोंबले म्हणाले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत नांदगाव हायस्कुलमध्ये पारंपारीक पध्दतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी वृक्षलागवड काळाची गरज असल्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी जि.प. सदस्य सुरेश खैरे म्हणाले की प्रशासकीय अधिकारी हे अभियान सक्षम व प्रभाविरित्या राबवीत असल्याने जनतेला याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजित गवळी यांनी उपस्थितांना आरोग्य सेवा सुविधांविषयक महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार वैशाली काकडे यांनी केले.कार्यक्रमास जि.प सदस्य सुरेश खैरे, प्रांताधिकारी रविंद्र बोंबले (रोहा), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, पाली सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, पंचायत समिती उपसभापती उज्वला देसाई, पं. स. सदस्या सविता हंबीर, नांदगाव सरपंच सोनल ठकोरे, पाच्छापूर सरपंच संजय हुले, नायब मुख्याध्यापक बळिराम निंबाळकर, अरिफ मनियार, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक शिल्पा शिरवडकर, विठोबा भिलारे आदिंसह नांदगाव ग्रामस्त व आदिवासी समाज बांधव, विद्यार्थी उपस्थीत होते.

या दाखल्यांचे केले वाटप
कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधवाना खातेवाटप,महाराजस्व अभियान, डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप, रेशनकार्ड,वय, अधिवास, व उत्पन्न दाखले वितरण, राष्ट्रीयत्वाचा दाखला अादी दाखले देण्यात आले. तसेच पुरवठा विषयक कामे, संजय गांधी निराधर योजना, आधार नोंदणी, आरोग्य विषयक माहिती,आधारकार्ड आदी उपक्रम प्रभाविपणे राबविण्यात आले.

Web Title: distribution of different certificates to tribal