परळी ग्रामपंचायतीच्या वतीने सात शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अमित गवळे
शुक्रवार, 20 जुलै 2018

वृक्षारोपन कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला. परळी विभागातील जि. प. प्राथमिक शाळा दुधानेवाडी, नाणोसे, नेरे, विजयनगर, पडघवली, विकासवाडी, ढोकशेत या शाळेतीळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील विद्यार्थ्यांना नुकतेच शालेपयोगी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील नानोसे राजिप शाळेत हा कार्यक्रम झाला. तसेच परळी ग्रामपंचायत आवारात व डॉ. प्रभाकर गावंड हायस्कुल परळी येथे वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी वृक्षारोपन कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला. परळी विभागातील जि. प. प्राथमिक शाळा दुधानेवाडी, नाणोसे, नेरे, विजयनगर, पडघवली, विकासवाडी, ढोकशेत या शाळेतीळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच परळी ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबीर देखिल राबविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच संदेश कुंभार म्हणाले की ग्रामिण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य केल्यास त्यांची सर्वांगिण प्रगती साधता येईल. यावेळी विठ्ठल सिंदकर म्हणाले कि, शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन असून गावाच्या विकासासाठी शिक्षणाचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. या कार्यक्रमास परळी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश कुंभार, उपसरपंच दिपक गायकवाड, ग्रा. पं. स. अॅड. प्रविण कुंभार, महेश ठाकूर, राया पवार, सुनिता सिंदकर, संचिता कदम,कामिनी राजपूरकर, तसेच माजी सरपंच दत्ता आवासकर, विठ्ठल सिंदकर, दिलीप जाधव, शेखर डोंगरे, राहुल गायकवाड,रमेश पवार,सम्यक क्रांती विचारमंचाचे अध्यक्ष मंगेश वाघमारे, मुख्याध्यापक पि. बि. वाघमारे, गेणू गायकवाड, मुख्याध्यापिका अर्चना सुर्वे, रवि राठोड आदींसह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of educational material to students of seven schools on behalf of Parli Gram Panchayat