पालीत छत्र्या, कापडी पिशव्या व जलशुध्दीकरण औषधाचे वाटप 

अमित गवळे
सोमवार, 2 जुलै 2018

पाली (रायगड) : पाली गावाचा सर्वांगिण विकास व समाजोपयोगी कामे करणे हे ध्येय समोर ठेवून रविवारी (ता. 1) येथील भक्त निवास क्रमांक 1 मध्ये अनुपमदादा मित्रमंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळामार्फत गरीब गरजू लोकांना हजारो छत्र्या, कापडी पिशव्या व जलशुध्दीकरण औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.

पालीतील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन अनुपमदादा मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अखंडपणे समाजसेवा करण्याचा संकल्प केला. अनुपमदादा मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी संदेश सोनकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मंडळाच्या उपाध्यक्षपदी वैभव मोहिते, सचिवपदी वैभव जोशी, सहसचिव प्रतिक तळे, खजिनदार अखिल महाडकर, नरेश शिंदे यांची नेमणुक करण्यात आली. 

राजकारण बाजूला ठेवून समाजकरणावर अधिकाधिक भर देणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले. पालीतील नागरीकांना आजही प्राथमिक व मुलभूत सेवासुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. पालीतील सांडपाणी व कचरा समस्या, अशुध्द पाणी, वाहतुक कोंडी आदी समस्यांनी पाली गावाला वेढले आहे. या समस्या सोडविण्यासाठी हे मित्रमंडळ काम करेल. 

या कार्यक्रमास अनुपम कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, धनंजय गद्रे, श्रीपाद वैद्य, सुदाम मेणे, मनोहर दांडेकर सर, गोविंद तळेकर, संदेश सोनकर, संजिवनी सोनकर, नथुराम बेलोसे, पाली आगरी समाज अध्यक्ष महेश खंडागळे आदिंसह मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश नाईक यांनी केले. तर अभार प्रदर्शन संदेश सोनकर यांनी केले. 

Web Title: distribution of umbrella cloth bags and water purifier chemical in pali