सिंधुदुर्गमध्ये जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर ; आठही तालुक्यांचे अध्यक्षही नियुक्त

District Congress executive announced in Sindhudurg
District Congress executive announced in Sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच 38 जणांची जिल्हाची नूतन कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीबरोबर आठ तालुकाध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधींची निवडही करण्यात आली. लवकरच परिपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असुन सक्रीय कार्यकर्त्यांची यात भरणा करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गावडे यांना सांगितले.


निवड करण्यात आलेल्या तालुकाध्यक्षामध्ये सावंतवाडीत महेंद्र सांगलेकर, वेंगुर्ले विधाता सावंत, दोडामार्ग वासुदेव नाईक, मालवण मेघनाध धुरी, कणकवलीत प्रदीप मांजरेकर, वैभववाडी दादामिया पाटणकर, कुडाळ रामचंद्र मुंज, देवगड उल्हास मणचेकर यांचा समावेश आहे. यात देवगड, कुडाळ येथे फेरनिवड झाली आहे.

याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी माहीती दिली. कोरोनाच्या संकटामुळे काही भागातील पदे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. शिवाय जिल्हाकार्यकारणी जाहीर करण्यास उशिर झाला. जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी अपूर्ण असुन परिपूर्ण कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले.

 
जाहीर कार्यकारीणी अशी :

 जिल्हा उपाध्यक्ष - इर्शाद शेख (वेंगुर्ले), अ‍ॅड. दिलीप नार्वेकर (सावंतवाडी), नागेश मोर्ये (कणकवली), विजय प्रभू (कुडाळ), सरचिटणीस - प्रकाश जैतापकर (कुडाळ), राजेंद्र मसुरकर (सावंतवाडी), महेंद्र सावंत (कणकवली), चंद्रशेखर जोशी (कुडाळ), खजिनदार- बाबल अल्मेडा, चिटणीस - महेश अंधारी, रविंद्र म्हापसेकर, एकनाथ नाईक, कृष्णा धाउसकर, विलास सावंत, धोंडीराम पवार, हरिश्‍चंद्र टेंबुलकर, खालीद बगदादी, भालचंद्र जाधव, सुभाष दळवी, शंकर वस्त, सुमेधा सावंत, आनंद परुळेकर, हायजिन फिलीप्स, सदस्य - संदेश कोयंडे, लिलाधर बांदेकर, अंकुश पारकर, सुरेश देवगडकर, संतोष आचरेकर, कुंदा पै, मधुमती मातोंडकर, इस्माईल शेख, विद्याप्रसाद बांदेकर, लक्ष्मण रावराणे, अमिदी मेस्त्री, विजय सावंत, चित्रा कनयाळकर, श्रीधर खेडेकर, माया चिटणीस, प्रदेश प्रतिनिधी - विकास सावंत, हीरोजी परब, रामचंद्र कुडतरकर, साईनाथ चव्हाण, विजय सावंत, अरुण मुरकर, सुगंधा साटम.


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com