जिल्ह्याची गौरवशाली परंपरा अधिक वृद्धिंगत करूया - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा अधिक वृद्धिंगत करण्याचा आपण संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, ‘‘आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखण्याचा आनंद उपभोगत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांप्रति तुम्हा-आम्हा सर्वांनाच नितांत आदर आहे. जिल्ह्यातील शहीद जवानांच्या तसेच स्वातंत्र्यसैनिकांप्रति सर्वांनीच उतराई होणे अगत्याचे आहे.’’

या वेळी पोलिस दल, होमगार्ड, डॉन बॉस्को हायस्कूलचे स्काऊट पथक, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली व पोलिसांच्या श्‍वान पथकाने शानदार संचलनाद्वारे मानवंदना दिली. डॉन बॉस्को हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. 
या वेळी आमदार वैभव नाईक, संग्राम प्रभूगावकर, अपर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी आदी उपस्थित होते. येथे मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हाधिकारी चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन समारंभ झाला.

Web Title: The district will enhance the glorious tradition more