सुवर्ण गणेश देवस्थानावर विकास पॅनेलचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

दिवेआगर - दिवेआगर (ता. श्रीवर्धन) येथील सुप्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या "श्री गणपती देव व पूजेचा नेमणूक ट्रस्ट'वरील सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत "सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेल'चे सर्वच्या सर्व सात उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले.

2017 ते 2022 या कालावधीसाठी विश्‍वस्त नेमण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. यात विजय सुदाम तोडणकर यांच्या नेतृत्वाखालील सर्व आठ सदस्यांचा पराभव झाला. एकूण 1,611 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेलला 996; तर विरोधी तोडणकर पॅनेलला 426 मते मिळाली. 189 मते अवैध ठरली. यापूर्वीच्या विश्‍वस्त मंडळाच्या दोन गटांमधील वाद विकोपाला गेला होता. या मंडळाची मुदत 31 जुलैला संपत आहे.

नवी मूर्ती घडविणार
सुवर्ण गणेशाची मूर्ती चोरीस गेली होती. देवस्थानचा कारभार पारदर्शक करून प्रथम मूर्तीचे सोने ताब्यात घेऊन लवकरात लवकर मूर्ती घडविण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. दिवेआगरच्या ग्रामस्थांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्‍वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही, अशी भूमिका सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेलचे प्रमुख महेश पिळणकर यांनी मांडली.

Web Title: diveaagar konkan news vikas panel Domination on suvarna ganesh devasthan