Diwali
Diwali

अाॅनलाईन, सोशल मिडियातून घ्या फराळाचा अास्वाद

पाली : दिवाळीत घरगुती फराळाला अधिक मागणी असते. हा घरगुती फराळ घरबसल्या मागवून घरपोच मोफत मिळाला तर दुधात साखरच… ऑनलाईन, फेसबुक अाणि व्हाॅट्सअपद्वारे सध्या घरपोच घरगुती दिवाळी फराळ उपलब्ध होत अाहे. त्यामूळे नोकरदार महिलांसह अनेकांची दिवाळी अगदी सुकर झाली आहे. अाॅनलाईन फराळ खरेदी व विक्रचा ट्रेंड वाढला अाहे. काय अाहे हा ट्रेंट जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे सकाळने.

धकाधकीच्या जिवनात सण-उत्सवाची तयारी करण्यासाठी अनेकांना वेळ नसतो. त्यात दिवाळीच्या फराळाची तयारी करणे म्हणजे दिव्यच झाले आहे. कित्येक वेळा चांगला दर्जाचा व परवडणार्या किंमतीत फराळ मिळावा यासाठी बाजारातील दुकानाच्या पायर्या झिजवाव्या लागतात. परंतू अाॅनलाईन मार्केटिंगने हि समस्या मार्गी लावली आहे.फेसबुकवरील विविध पेजच्या माध्यमातून तसेच व्हाॅट्सअपद्वारे घरगुती फराळ विक्रि होत आहे. त्यामुळे एका फोनवर, व्हाॅट्सअप मेसेज, एसएमएस किंवा इमेलवर घरपोच तत्काळ उत्तम प्रतीचा फराळ उपलब्ध होत आहे. या खरेदीतून ग्राहकांना काही अाकर्षक अाॅफर देखिल मिळत आहेत. त्यामुळे अाॅनलाईन फराळ विक्रि व खरेदी मोठ्या प्रमाणात होत असून प्रतिसाद ही चांगला आहे. इतर वस्तुंबरोबरच अाता फराळाने देखिल अाॅनलाईन मार्केट काबीज करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे.

फराळाचा फॅमिली पॅक अाणि गिफ्ट पॅक
अाॅनलाईन फराळाचा फॅमेली पॅक उपलब्ध आहे. यामध्ये चिवडा, चकल्या, लाडू, करंजी, शंकपाळी, अनारसे अादी फराळाच्या जिन्नसां बरोबर चक्क उटणे, अाकाश कंदिल, अायुर्वेदिक तेल, पणत्या,चिरोटे, रांगोळी व रांगोळी पुस्तक सुद्धा मिळत आहे. तसेच फराळाचा फॅमिली पॅक बरोबर चाॅकलेट पॅक हि देखिल अाॅफर आहेत. असे डोंबिवलीतील पुजा गृह उद्योगच्या संचालिका पुजा ग्रामपुरोहित यांनी सकाळला सांगितले. फराळाचा गिफ्ट पॅक सुद्धा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.

एक पाऊल महिला उद्योग उभारणीसाठी, गृहउदयोगाच्या सक्षमिकरणासाठी
दिवाळी निमित्त माईक्रोबास्केट या संस्थेने ऑनलाईन घरपोच फराळाची सोय केली आहे. यांचे विषेश म्हणजे त्यांनी महिला बचत गट, गृहउदयोग सक्षमीकरण व महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलेले आहे. त्यांच्या मार्फत तयार केलेल्या फराळाच्या दर्जेदार वस्तू सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत घरपोच पोहचवित आहेत. मायक्रोबास्केट या संस्थेचे संस्थांपक शैलेश शृंगारे, दिनेश कुंभार, मंगेश कोचरेकर अाणि हर्षल चव्हाण यांची हि संकल्पना आहे. त्यांच्याकडे अनेक महिला व गृहउद्योगांनी संपर्क साधून विवीध प्रकार माल व वस्तू विक्रिसाठी दिला आहे अशी माहिती त्यांनी सकाळला दिली.

ऑनलाईन पणत्या, दिवे, रांगोळी शिट्स, अाकाश किंदिल अाणि ड्रायफ्रुट्स सुद्धा
अाॅनलाईन फराळाबरोबर अाकर्षक दिवे, पणत्या, रांगोळी शिट्स,अाकाश कंदिल अाणि ड्रायफ्रुट्स सुद्धा अाॅनलाईन उपलब्ध आहेत.अतिशय परवडणार्या किंमतीमध्ये अाकर्षक आकार, पोत अाणि दर्जाचे हे सर्व साहित्य व पदार्थ आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या उडया या वस्तू खरेदी करण्यासाठी पडत आहेत.

फेसबुक पेज व व्हाॅट्सअप गृप, विक्रेते आणि ग्राहकांना लाभ
वैयक्तीकपणे अगदी घरी तयार केलेल्या वस्तू तसेच छोट्या मोठ्या उद्योजकांच्या वस्तुंना मार्केट मिळावे यासाठी फेसबुकवर विविध पेज तयार करण्यात आले आहेत. युवा उदयोजक व उदयोजिका यांसारख्या फेसबुक पेजच्या माध्यमातून अनेक छोटो मोठे विक्रेते अापला माल विकत आहेत. तसेच अनेक ग्राहक देखिल या पेजला विझीट देत आहेत. अापला माल किंवा वस्तू घरबसल्या खरेदी व विकण्यासाठी ऑनलाईन व सोशल मिडीया हे अतिशय प्रभावी माध्यम अाणि साधन ठरत आहे. या माध्यमातून ग्राहकांनाही परवडणार्या किंमतीमध्ये चांगल्या प्रतिच्या वस्तू अगदी मोफत घरपोच मिळत आहेत. तर विक्रेत्यांना जाहिरातीसाठी किंवा मार्केट मिळविण्यासाठी अधिक श्रम व पैसे मोजावे लागत नाहीत.

मागील वर्षी ऑनलाईन फराळ विक्रिचा प्रयोग करुन बघितला.यावर्षी खुप चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या सारख्या गृहिणीला शोसल मिडियामुळे तयार माल विकण्यासाठी कुठेही पॅम्प्लेट वाटावे लागत नाहीत किंवा जाहिरातीसाठी खर्च करावा लागत. अाॅनलाईन फराळ खरेदी करणारा ग्राहक अधिक वेळ न दवडता चटकण खरेदी करतात. ग्राहकांनाही चांगल्या प्रतिचा व दर्जाचा माल उपलब्ध करुन देतो. त्यामुळे ग्राहक देखिल समाधानी होतात. या माध्यमातून इतर गृहिणींनाही चार पैसे मिळतात.
- पुजा ग्रामपुरोहित, संस्थापक, पुजा गृह उदयोग, डोंबिवली

घरगूती व गृह व छोटे उदयोग करणार्या महिलांना सोबत घेवून त्यांनी तयार केलेला फराळाला तसेच इतर सर्व प्रकारच्या वस्तुंना अाॅनलाईन, फेसबुक व व्हाॅट्सपच्या माध्यमातून माईक्रोबास्केट या अामच्या संस्थेद्वारे मार्केट उपलब्ध करुन देतो. या वर्षी विरार,बदलापुर, नवी मुंबई, पनवेल व पुण्यापर्यंत माफक दरात फराळ मोफत घरपोच पोहचविला आहे. फराळ तसेच संपुर्ण महाराष्ट्रभर गृहिणींनी व गृहउदयोगाद्वारे तयार केलेल्या विविध वस्तू अाॅनालाईन माध्यमातून पोहचवितो. अधिकाधिक महिला, बचत गट व छोट्या उदयोजकांनी अामच्या सोबत यावे अाणि अापला माल विकूण अार्थिक सक्षम व्हावे. संपर्क – ९८१९३०५७७०, ८८९८३०४४८१
- दिनेश कुंभार, माईक्रोबास्केट, मुंबई

माईक्रोबास्केट कडून अाॅनलाईन फराळ मागविला अाहे. सर्व पदार्थ त्यांनी सांगिल्या प्रमाणेच दर्जेदार, चविष्ठ व परवडणार्या किमतीत मिळाले. दिवाळीत फराळ बनविण्यासाठी वेळ नसतो परंतू अाॅनलाईन फराळ मिळाल्याने फराळ करण्याचा व्याप वाचला.कित्येक वेळा दुकानात साजुक तुपातील पदार्थ सांगुन डालड्याचे पदार्थ मिळता. परंतू मला अाॅनलाईन साजुक तुपातील पदार्थ मिळाले. त्यामुळे समाधानी आहे.
- शिल्पा पार्टे, वर्किंग वुमेन, एैरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com