कॅन्सरची उगाच धास्ती नको 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

कणकवली - कॅन्सर झाला म्हणून गर्भगळीत होण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. प्राथमिक अवस्थेत उपचार झाले तर रुग्णाचे प्राण सहज वाचू शकतात. कॅन्सरची या आजाराची उगाच धास्ती घेऊ नये तर नातेवाइकांनी, मित्रमंडळींनी स्वत:चे आणि रुग्णाचे मनोबल वाढवावे, असे आवाहन रोटरी क्‍लबचे डिस्ट्रीक गव्हर्नर डॉ. विनयकुमार पैरायकर यांनी येथे केले. 

कणकवली - कॅन्सर झाला म्हणून गर्भगळीत होण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. प्राथमिक अवस्थेत उपचार झाले तर रुग्णाचे प्राण सहज वाचू शकतात. कॅन्सरची या आजाराची उगाच धास्ती घेऊ नये तर नातेवाइकांनी, मित्रमंडळींनी स्वत:चे आणि रुग्णाचे मनोबल वाढवावे, असे आवाहन रोटरी क्‍लबचे डिस्ट्रीक गव्हर्नर डॉ. विनयकुमार पैरायकर यांनी येथे केले. 

शहरातील येथील संजीवनी रुग्णालयात रोटरी क्‍लब कणकवली, इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉक्‍टर्स फ्रायडे क्‍लब कणकवली, राजस्थान विष्णू सेवा समिती कणकवली यांच्यातर्फे कॅन्सरपूर्व तपासणी शिबिर झाले. यात जिल्ह्यातील 430 जणांनी सहभाग घेतला. शिबिराचे उद्‌घाटन डॉ. पैरायकर यांच्यासह कणकवली रोटरी क्‍लबचे अध्यक्ष अनिल कर्पे, असिस्टंट गव्हर्नर डॉ. सुहास पावसकर यांनी केले. या वेळी डॉ. नितीन शेट्ये, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. आशय कर्पे, डॉ. अश्विनी नवरे, ऍड. दीपक अंधारी, डॉ. जितेंद्र मालवीया, डॉ. हेमा तायशेटे, सचिव महेंद्र मुरकर, दादा कुडतरकर, दीपक बेलवलकर, मेघा गांगण, रमेश मालवीय, वर्षा बांदेकर, दिशा अंधारी, राजश्री रावराणे, तृप्ती कांबळे, संगीत बेलवलकर आदी उपस्थित होते. 

डॉ. पैरायकर म्हणाले, ""कॅन्सरग्रस्त रुग्णाने आपली इच्छाशक्‍ती प्रबळ केली पाहिजे. कॅन्सर तपासणीसाठी आयोजित केलेल्या या शिबिरात एकही कन्सरचा रुग्ण सापडू नये, असे मला मनोमन वाटते. तसेच कॅन्सर रुग्णांसाठी रोटरी क्‍लबने उपक्रम राबविल्यास रुग्णांची तपासणी व इतर कार्यासाठी आपण सदैव उपस्थित राहणार आहोत.'' 

कॅन्सरपूर्व तपासणी शिबिरात रविवारी 200 व सोमवारी 230 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी 27 तज्ज्ञ डॉक्‍टरांनी सेवा बजावली. ऍड. दीपक अंधारी यांनी प्रास्ताविक केले. नितीन बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

"मिशन कॅन्सर कंट्रोल - खोजो' 
"कॅन्सर मिटाओ' कॅन्सरचा नारा देत रोटरी क्‍लबतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कॅन्सर डिटेक्‍शन व्हॅनमधील अत्याधुनिक मशीनद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. ममोग्राफी बायोप्सीसारख्या महागड्या कॅन्सर तपासणी या वेळी करण्यात आली. स्तनाचा कॅन्सर, तोंडाचा, फुफ्फुसाचा, ब्लड, गर्भाशय, प्रोटेस्ट कॅन्सरचीही या वेळी तपासणी करण्यात आली असल्याची माहिती रोटरीतर्फे देण्यात आली. 

Web Title: Do not be afraid of cancer