वेंगुर्लेत बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

वेंगुर्ले - तालुक्‍यातील धान्य दुकानात बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येऊ नये व या पद्धतीमुळे सहकारी संस्थांच्या विविध अडचणी समस्या बाबत आज तालुक्‍यातील संस्थाचालक, चेअरमन, प्रतिनिधी यांनी तहसीलदार यांचे लक्ष वेधले. याबाबत निवेदन तालुक्‍यातील सर्व सहकारी संस्थच्यावतीने नायब तहसीलदार यांना देण्यात आले. 

वेंगुर्ले - तालुक्‍यातील धान्य दुकानात बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येऊ नये व या पद्धतीमुळे सहकारी संस्थांच्या विविध अडचणी समस्या बाबत आज तालुक्‍यातील संस्थाचालक, चेअरमन, प्रतिनिधी यांनी तहसीलदार यांचे लक्ष वेधले. याबाबत निवेदन तालुक्‍यातील सर्व सहकारी संस्थच्यावतीने नायब तहसीलदार यांना देण्यात आले. 

तालुका हा डोंगराळ भाग असून या तालुक्‍यातील सर्व सहकारी संस्था व संस्था चालक यांनी या ठिकाणी सर्व दुकानात इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही. तसेच सध्या संस्थांना  मिळणारे मार्जिन अल्प असून गाडी भाडे, हमाली वाढल्यामुळे आपल्याकडून मिळणारे रिबेट हेही अल्प आहे त्यामुळे मार्जिनमधून अगोदरच गाडी भाडे, वाहतूक, हमाली यावर मोठंया प्रमाणावर खर्च होत असताना जेमतेम ४० ते ५० रुपये एवढेच मार्जिन शिल्लक राहते यात भरघोस वाढ करून मिळावी. धान्य कर्मचारी सभा घेताना संस्था चालक चेअरमन याचे नावे सभेची सूचना ७ दिवस आधी देण्यात यावी, संस्था कर्मचाऱ्यांवर आधार व अन्य कामे लादण्यात येतात त्याची सक्ती शासनाने करू नये आत्तापर्यंत केलेल्या कामाचा मोबदला शासनाने धान्य दुकान कर्मचाऱ्यांना द्यावा. अतिरिक्त कामे लादल्यास त्याचे वेगळे मानधन शासनातर्फे दिले जावे. धान्याच्या निरनिराळ्या योजनेचे धान्य वितरणातून मिळणारे अल्प मार्जिन स्टेशनरी व वाहतूक भाडे, हमाली आणि इमारत भाडे तसेच व्यवस्थापन खर्च या सगळ्या बाबी देणे अशक्‍य असते त्यामुळे धान्य दुकाने दिवसेंदिवस तोट्यात चालली आहेत यावर शासनाने काही तरी तोडगा काढावा. धान्य दुकान चालकांची, जिल्हा संघटनेने घेतलेल्या २०१७ पासूनच्या धान्य उचल न करण्याच्या निर्णयास तालुका धान्य दुकान चालकांचा पूर्ण पाठींबा आहे. सध्या केशरी रेशनकार्ड धारकांचे बंद असलेले धान्य पूर्ववत सुरु केले जावे त्यामुळे सर्वांना धान्य मिळून संस्थेच्या नफ्यात ही वाढ होईल अशा विविध मागण्या घेऊन तालुक्‍यातील सर्व सहकारी संस्था चेअरमन, धान्य दुकानदार, गटसचिव आणि सेल्समन यांनी आज तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहून निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे त्यांनी यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रियांका लोखंडे व महसुल नायब तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी हे निवेदन स्वीकारत ते पुढील कार्यवाहीसाठी शासन स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले.

Web Title: do not use biometric process in vengurle