दोडामार्ग : मणेरीतील रस्त्याची दुरवस्था

शिवसेनेने वेधले लक्ष; दुरुस्तीसाठी बांधकाम विभागास निवेदन
रस्त्याची दुरवस्था
रस्त्याची दुरवस्थाsakal

दोडामार्ग : बांदा-दोडामार्ग मार्गावरील मणेरी बाजारपेठ ते कुबलवाडीदरम्यानच्या रस्त्याला ‘एमएनजीएल’च्या पाईपलाईनमुळे भेगा पडल्या आहेत. बाजूपट्टी खचली असून, त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी युवा सेनेचे तालुका समन्वयक भगवान गवस, मणेरी उपसरपंच सुधीर नाईक, शिवसेनेचे मणेरी उपविभागप्रमुख शिवराम मोर्लेकर, शिवसेनेचे तालुका कार्यालय प्रमुख गुरुदास सावंत आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दोडामार्ग-बांदा, दोडामार्ग-आयी या रस्त्यांची बाजूपट्टी मजबूत करण्यासाठी आपणाकडे संबंधित कंपनीने रक्कम भरल्याची माहिती कंपनीच्या ठेकेदाराकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बाजूपट्टी मजबूत बनवून रस्ता निर्धोक बनविण्याची आणि अपघात टाळण्याची जबाबदारी आपली होती. ती आपण पार पाडलेली नाही. त्यामुळे अपघात होऊन जीवित वा वित्तहानी झाल्यास आपणही कंपनी इतकेच जबाबदार असाल. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय आणि अपघात टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात; अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित कंपनी आणि सार्वजानिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून जनआंदोलन उभारले जाईल. त्याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com