विन्हेरे गावात तीन लहान मुलांसह पाच जणांवर कुत्र्याचा हल्ला

dog
dog

महाड : तालुक्यातील विन्हेरे गावात घरासमोर खेळत असलेल्या तीन लहान मुलांनावर भटक्या कुत्र्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. याच गावातील एका वृद्ध व्यक्तीवर आणि एका महिलेला देखील कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. या सर्व जखमींना विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर महाड ट्रामा केअर सेंटर मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढीस लागला असून कांही दिवसापूर्वी दासगाव येथे भटक्या कुत्र्याने कांहीजणांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच विन्हेरे येथे आज सोमवारी सकाळी घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये अवघ्या दीड वर्षाच्या श्रीअंश गणेश बांगर या बालकाच्या चेहऱ्यावर हल्ला केला. तर विवील सचिन विसापूरकर (वय 8), श्रावणी संदीप आंजर्लेकर (वय 9), यांच्या देखील हातावर आणि पायावर कुत्र्याने चावा घेतला आहे. याच बरोबर विन्हेरे येथील रामचंद्र विठोबा कदम (वय 6o रा.फौजी अंबावडे), सनिली शिवानंद कटीमली (वय34 )या दोघानांही या कुत्र्याने जखमी केले आहे. या सर्वांवर महाड ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचार करण्यात येत आहेत. या बालकांना खोल जखमा झाल्या असल्याने त्यांना अँटी रेबीज सिरम देणे गरजेचे असल्याचे डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com