मंडणगड शहरात श्वानांचा अकरा जणांना चावा

सुनील माळी
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मंडणगड - मंडणगड शहरात मोकाट फिरत असलेल्या श्वानांनी गेल्या दोन दिवसात अकरा जणांचा चावा घेतला आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 

मंडणगड - मंडणगड शहरात मोकाट फिरत असलेल्या श्वानांनी गेल्या दोन दिवसात अकरा जणांचा चावा घेतला आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 

बाजारपेठ व बसस्थानक परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.  स्वप्नील शिगवण (वय 12, रा. भिंगळोली), सक्षम लोखंडे (7, मंडणगड), श्रावणी पिंपळे (10, रा. मंडणगड) यांना 26 डिसेंबरला, तर जय धाडसे (3, रा. म्हाप्रळ), विनय पवार (18, रा. पालघर), इकरा स्मित (18, मुंबई), विवेक जोशी (13, पालवणी), रोशनी जाधव (17, मंडणगड), राहुल खांबे (23, मंडणगड), सनिदा साखरे (10, निगडी), परमात्मा जामुगडे (15, माहू) यांना 27 डिसेंबरला काळ्या रंगाच्या पिसाळलेल्या कुत्रीने चावा घेतला.

श्वानदंशामुळे बाधित झालेल्या सर्वांवर भिंगळोली ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. काही दिवसांपासून झुंडीने फिरणार्‍या मोकाट कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे पहाटे, रात्री फिरायला जाणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Dog bites 11 peoples in Mandangad City